शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

बंदी स्वागतार्ह; पण पर्याय द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:39 PM

राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी आदेशाला दुसºया दिवशी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदी असतानाही अनेक ग्राहकांच्या हातात कॅरिबॅग दिसून येत होत्या; पण काही ग्राहकांनी स्वत:हून कापडी पिशव्या आणल्या होत्या. काही दुकानदारांकडे खाकी रंगाच्या कागदी पिशव्या आढळून आल्या.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांकडून कारवाईस विरोधनागरिकांच्या हाती कापडी पिशव्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी आदेशाला दुसºया दिवशी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदी असतानाही अनेक ग्राहकांच्या हातात कॅरिबॅग दिसून येत होत्या; पण काही ग्राहकांनी स्वत:हून कापडी पिशव्या आणल्या होत्या. काही दुकानदारांकडे खाकी रंगाच्या कागदी पिशव्या आढळून आल्या. ज्या प्लास्टिक विके्रत्यांवर शनिवारी दंडात्मक कारवाई करण्यात आली त्यांनी विरोधाचा सूर आवळला आहे. प्लास्टिकबंदी लागू करण्यापूर्वी पर्याय उपलब्ध करून द्यायला हवा, अशा भावना चित्रा चौकातील व्यापाºयांनी व्यक्त केल्या.रविवारी इतवारा बाजार परिसरात अनेक ग्राहकांजवळ कापडी पिशव्या आढळून आल्या. अनेक फळविक्रेत्यांनी ग्राहकांना कागदात फळे बांधून दिल्याचे चित्र दिसून आले. तसेच अनेक फळविक्रेत्यांनी हातगाडीखाली लपविलेल्या कॅरिबॅग काढून ग्राहकांचे समाधान केले. योग्य प्रकारे जनजागृती न करता कायद्याचा धाक दाखवीत अंमलबजावणीच्या सबबीखाली शासकीय यंत्रणेने दंड आकारणीवर भर दिल्याची प्रतिक्रियाही उमटली. नेमक्या कोणत्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी आहे, कोणत्या नाही, पर्याय काय, याबद्दल अनभिज्ञता असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम दिसून आला. प्लास्टिकबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर प्लास्टिक जमा करण्यासाठी महापालिकेने झोननिहाय केंद्रे सुरू केली. बाजारपेठेत प्लास्टिक जमा करण्यासाठी यंत्रणा उभारण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र, प्लास्टिकबंदी सुरू झाली, तरी नेमकी अंमलबजावणी होऊ शकली नाही. प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक चमचे, काच, ग्लास, स्ट्रॉ, तसेच थर्माकोलचे ताट, ग्लास, वाट्या आणि उत्पादने साठविण्यासाठीची प्लास्टिक आवरणे, द्रव्यपदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक, सजावटीच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत नागरिकांना पुरेशी माहिती न मिळाल्याने प्लास्टिकच्या कोणच्या वस्तू वापरात आणावे व कोणत्या टाळावे याबाबत संभ्रम कायम आहे. शहरातील बड्या प्रतिष्ठानांतून प्लास्टिक काहीअंशी हद्दपार झाल्याचे चित्र दिसून आले. कॅम्प आणि बडनेरा मार्गावरील मोठ्या प्रतिष्ठानांतून प्लास्टिकऐवजी खाकी रंगाच्या पिशवीत चीजवस्तू देण्यात आल्यात.आज व्यापाऱ्यांचा बंदशनिवारी महापालिकेचे पथक प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्या आस्थांपनांवर कारवाई करीत असताना त्यांची व्यापाऱ्यांशी चकमक उडाली. काही व्यापारी हमरीतुमरीवर आले. व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या दंड वसुलीला खंडणी वसुली संबोधून जोरदार विरोध केला. दुकाने बंद करून रविावारी व्यापार बंदची हाक दिली. मात्र रविवार असल्याने फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सोमवारपासून प्लास्टिक बंदीविरोधात बेमुदत व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाºयांनी घेतला आहे. रविवारी चित्रा चौकात एकत्र येत व्यापाºयांनी महापालिकेचा निषेध नोंदवला.चांदूर बाजारात ३० किलो प्लास्टिक जप्तचांदूर बाजार : राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर शनिवारी २३ जूनला नगरपालिकेकडून बाजारपेठेत कारवाई करण्यात आली. या कारवाईत वेगवेगळ्या दुकानांमधून ३० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. ही कारवाई स्थानिक नगर पालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात आली. शनिवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत ही धडक कारवाई सुरू होती. या दरम्यान बाजारपेठेतील हॉटेल्स, फळविक्रेते, किराणा दुकान, पादत्राणे विक्रेते इत्यादी ठिकाणी कसून तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान काही ठिकाणावरून प्लास्टीक कॅरीबॅग, थर्माकोल द्रोण, प्लास्टिक ग्लास जप्त करण्यात आले.खाकी पाकिटांचे भाव वधारलेकागदी पाकिटे बाजारात विक्रीला आले आहेत. आवक कमी व मागणी जास्त असल्याने रविवारी किलोमागे १० ते २० रुपयांनी भाववाढ करून ते विकल्या जात होते. ५० ते ११० रुपये किलोदरम्यान या खाकी कागदाचे पाकिटे विकल्या जात होते.५०,५०० रुपयांचा दंडमहापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत पाच झोन कार्यालयांच्या पुढाकाराने शहरात शनिवारी व रविवारी प्लास्टिक बंदीची मोहीम राबविण्यात आली. एकूण ५० पेक्षा अधिक आस्थापनांची पाहणी करून तेथील १०० किलो प्लास्टिक जप्त केले. तसेच त्यांच्याकडून ५० हजार रुपये दंड वसुली करण्यात आली. शनिवारी धोराजीवाला स्टोर्स, कल्याण ट्रेडर्स, सरस्वती मिल्क , संजय पटेरिया, आतिक प्रोव्हिजन, सचिन तिखिले, मथुरा भोजनालाय, बनारसे भोजनालाय व रविवारी बोनिप्रसाद दुबे यांच्याकडून एकूण ५० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.