डेहणी येथे श्रमदानातून साकारला बंधारा
By Admin | Updated: May 31, 2016 00:27 IST2016-05-31T00:27:29+5:302016-05-31T00:27:29+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारातून प्रेरणा घेत पाणी ‘अडवा पाणी जिरवा’चा संदेश देत पाच तास भर उन्हात श्रमदान करीत...

डेहणी येथे श्रमदानातून साकारला बंधारा
युवकांचा संयुक्त उपक्रम : 'लोकमत जलमित्र अभियाना'ची प्रेरणा
तिवसा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारातून प्रेरणा घेत पाणी ‘अडवा पाणी जिरवा’चा संदेश देत पाच तास भर उन्हात श्रमदान करीत राष्ट्रसंत तुकडोजी युवक विचार मंच तिवसाचे कार्यकर्त्यांनी तिवसा तालुक्यातील डेहणी गावात सूर्यगंगा नदीवर श्रमदानातून बंधारा बांधला.
देशात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती आहे. यामुळे जनतेसह शेतकरी संकटात आहेत. यासाठी विविध योजना राबवीत असले तरी ग्रामीण भागात शेतकरी वर्गांचे काय हाल आहे, हे शेतकऱ्यांनाच माहीत आहे.
मागेल त्याला शेततळे, असा सरकारचा नारा आहे. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ असा शासनाचा नारा असला तरी प्रत्यक्षात काहीच नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेतून सांगातत. श्रमदानाचे सप्ताह घेवोनी ! रस्ते दुरुस्त करावे सर्वांनी ! शोषक खड्डे, मोऱ्या करोनी ! सांडपाणी थांबवावे!! सामुदायिक प्रयत्नांनी सामर्थ वाठे कोणोकणी जीथे नसे घोटभर पाणी तथे सरिता वाहू लागे ! हा महाराजांचा संदेश घेत तिवसा व डेहणी येथील युवकांनी श्रमदान करत बंधारा धांणला.
यावेळी तालुकाध्यक्ष अमर वाखडे, सचिव अभिमत शिरभाते, शाखा अध्यक्ष संकेत कुबडे, विवेक सोनोने, तेजस खंडार, अजय भागवत, अनिकेत चौधरी, शैलेश ताकपिरे, कुंंदन कुबडे, आशिष होल्हेसह युवकांनी श्रमदान केले. (प्रतिनिधी)
शेतीसाठी पाणी व भविष्यात पाण्याची गरज पाहता पाण्याची टंचाई भासू नये यासाठी लोकमत जलमित्र अभियानातून बंधाऱ्याची प्रेरणा घेतली आहे. व युवकांच्या सहकार्याने बंधारा बांधला आहे.
- अमर वानखडे,
तालुकाध्यक्ष,रा.तु.म.यु.विचार मंच