शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

अमरावतीच्या बांबू प्लांटमध्ये विमानाने आली रोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 18:19 IST

अमरावती येथील बांबू गार्डनमध्ये विविध प्रजाती विकसित केलेल्या आहेत. त्यात आणखी भर पाडण्यासाठी परराज्यातून बांबूच्या विविध प्रजातींची रोपे विमानाने आणण्यात आली. यामध्ये २२ प्रकारच्या रोपांचा समावेश आहे.

- इंदल चव्हाणअमरावती - येथील बांबू गार्डनमध्ये विविध प्रजाती विकसित केलेल्या आहेत. त्यात आणखी भर पाडण्यासाठी परराज्यातून बांबूच्या विविध प्रजातींची रोपे विमानाने आणण्यात आली. यामध्ये २२ प्रकारच्या रोपांचा समावेश आहे.अमरावती येथील वडाळी तलावानजीक वनविभागांतर्गत बांबू गार्डन नावारूपास आले आहे. तेथे विविध प्रजातीचे बांबू विकसित करण्यात आले आहेत. येथे वनपाल सैयद सलीम यांनी केरळ राज्यातील २२ प्रजातीच्या बांबूंची रोपे आणण्याचा निर्णय वरिष्ठांच्या मार्गदर्शनात घेतला. यामध्ये बांबूसा डिस्सिम्यूलेटर, बांबूसा टेक्सटिलिस, सेफालोस्टाचाइम फुचसिएनम, सेफालोस्टाचाइम युनानिकस, डायनोचलोआ सॅचेलांदी, गिगांटोचलोआ मांगोने, गिगांटचलोआ व्हर्टिसिल्लाटा, मेलोकातमस कॉम्पॅक्टीफ्लोरस, आॅचलांद्रा तालबोती, आॅचलांद्रा विट्टी, आॅचलांद्रा सेटिगेरा, आॅचलांद्रा ट्राव्हंसोरिया हिरसुता, फिलॉस्ताचिस सल्फ्युरिया, सेउडॉक्सीटेनांथेरा बौर्डीलोलणी, ससा फॉर्क्यी व्हेरिएगेटेड, बांबूसा ब्रोमिश, डेंड्रोकालमस एण्डोमनिका, फिलॉस्टॅचीस व्हेरिगेटेड, व्हेरिगेटेड कलरचेंज या प्रजातीचे बांबूंची मातीविरहित रोपे जवळपास १ क्विंटल वजनाची विमानाने आणावी लागली. ती जिवंत राहावी, यासाठी कमी वेळेत आणणे गरजेचे असल्याने विमानाचा पर्याय निवडल्याचे वनपाल सैय्यद सलीम अहमद यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

आर्द्रतेसाठी उपयुक्तबांबू ही गवताची जात आहे. बांबूची पाने लांब आणि निमुळत्या आकाराची असतात. पाने गळाल्यानंतर जमिनीवर आछादतात. पावसाचे पाणी थेट जमिनीत न शिरता पाना-पानांतून जमिनीत मुरते. जमिनीत ओल असताना वरून पाने असल्याने  उन्हाचा थेट जमिनीवर प्रवेश होत नसल्याने त्या भागात आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहते. त्याचा इतर पिकांनाही फायदा होतो. त्यामुळे शेतकºयांनी नापिकीच्या भागात बांबूची लागवड केल्यास त्याचा लाभ निश्चित होऊ शकेल.

खारपाणपट्ट्यात बांबूची लागवड फायद्याचीमध्यभारतातच खारपाणपट्ट्याची जमीन असून, क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने ते पिकांसाठी अपायकारक ठरते. त्यामुळे अशा जमिनीत भरघोस उत्पन्न मिळू शकत नाही. यावर उपाययोजना म्हणून अशा भागात बांबूची शेती केल्यास कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळू शकते. तसेच शेताला कुंपण घालण्यासही बांबू उपयुक्त ठरू शकते. बांधावर काटेरी बांबूची लागवड केल्यास कुंपणाचा खर्चही वाचेल आणि बांधापासूनदेखील शेतकºयांना उत्पन्न मिळेल. ही प्रणाली काही शेतकºयांच्या लक्षात आल्याने आता याकडे शेतकºयांचा कल वाढीस लागला आहे.

परराज्यातून आणलेला बांबू येथील वातावरणाशी समरस बनविणे, त्याला महाराष्ट्रीय प्रजातीत रुपांतरण करून तो शेतकºयांना लागवडीसाठी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याचा शेतकºयांना लाभ निश्चित होईल.- सैय्यद सलीम अहमद, वनपाल, वडाळी मध्यवती रोपवाटिका.

टॅग्स :Amravatiअमरावती