बांबू रोपवनात आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:14 IST2021-03-10T04:14:05+5:302021-03-10T04:14:05+5:30
लोणटेक बीटमधील रोपवनाचे नुकसान पोहरा बंदी : वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या भातकुली वतुर्ळातील लोणटेक बीट वनखंड क्रमांक ७३ मधील ...

बांबू रोपवनात आग
लोणटेक बीटमधील रोपवनाचे नुकसान
पोहरा बंदी : वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या भातकुली वतुर्ळातील लोणटेक बीट वनखंड क्रमांक ७३ मधील राखीव बांबू रोपवनामध्ये रविवारी आग लागल्याने वनपाल, वनरक्षक वनमजुरांची तारांबळ उडाली.
लोणटेक बीटमध्ये दुपारी आग लागताच वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनाखाली भातकुली वर्तुळ अधिकारी पी.टी.वानखडे, लोणटेक बीट वनरक्षक नवीद काझी, प्रशांत खाडे, वनमजूर निरंजन राठोड यांनी रोपवनामधील आग आटोक्यात आणली. या आगीमुळे बांबू वृक्षांना कोणतीही हानी झाली नसून, या आगीत रोपवनातील एक हेक्टर गवत, पालापाचोळा जळून खाक झाला. ही आग अग्निशामक बंबाद्वारे विझविण्यात आली.