बैरागडची रुग्णवाहिका इंदुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:01:34+5:30
तेथून ही रुग्णवाहिका थेट प्रकल्प अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर उभी करण्यात आली. त्यातून दोन ते तीन प्रवासीबॅग काढण्यात आल्या. लगतच्या एमएच २७ बीव्ही ३१०० क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने त्या बॅग टाकून एक महिला व एक पुरुष, असे दोघे अमरावतीकडे निघाले. शुक्रवारी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला.

बैरागडची रुग्णवाहिका इंदुरात
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : तालुक्यातील बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका थेट जिल्हा सोडून इंदूरला पाठविण्यात आली. शुक्रवारी दुपारी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील भोकरबर्डी वनतपासणी नाक्यावर आल्याची माहिती आहे.
तेथून ही रुग्णवाहिका थेट प्रकल्प अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर उभी करण्यात आली. त्यातून दोन ते तीन प्रवासीबॅग काढण्यात आल्या. लगतच्या एमएच २७ बीव्ही ३१०० क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने त्या बॅग टाकून एक महिला व एक पुरुष, असे दोघे अमरावतीकडे निघाले. शुक्रवारी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला. एकीकडे रुग्णवाहिकेविना रुग्ण दगावत असताना उपलब्ध रुग्णवाहिका ‘व्हीआयपींच्या दिमतीला असल्याचा आरोप आ. पटेल यांनी केला. त्यांनी चौकशी केली असता, ती रुग्णवाहिका तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी एसडीओंच्या सूचनेनुसार इंदूर येथे नेल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकाºयांच्या सूचनेनुसार ती रुग्णवाहिका इंदूर येथे पाठविल्याचे उत्तर उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनी आमदार पटेल यांना दिले.
राजकुमार पटेलांकडून चौकशीची मागणी
अकोला जिल्ह्यातील चोहोट्टा बाजार येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या गर्भवतीच्या मदतीसाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे मागणी केली असता त्यांनी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगितले. दुसरीकडे मध्यप्रदेशातील इंदूर येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दिमतीला लावल्याचा आरोप आ. पटेल यांनी केला. याची चौकशी करण्याची मागणी आमदार पटेल यांनी केली आहे.
एम एच २७ एए ५०६६ रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्र बैरागड येथील आहे. सहाय्यक जिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून ती रूग्णवाहिका इंदोर येथे पाठविण्यात आली होती.
- शशिकांत पवार,
तालुका आरोग्य अधिकारी, धारणी
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून धारणी येथून रुग्णवाहिका पाठविण्यात आली. त्यातून हृदय शस्त्रक्रिया झालेल्या महिला रूग्णाला आणले गेले.
- मिताली सेठी,
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, धारणी