तिवस्यात आश्वासनांची खैरात

By Admin | Updated: May 28, 2016 00:16 IST2016-05-28T00:16:37+5:302016-05-28T00:16:37+5:30

तिवसा शेतकरी सहकारी जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग सहकार क्षेत्रातील मंडळाची निवडणूक २९ मे रोजी होत आहे.

The bailouts of trusts in the city | तिवस्यात आश्वासनांची खैरात

तिवस्यात आश्वासनांची खैरात

दोन जागा अविरोध : शेतकरी जिनिंग-प्रेसिंग निवडणूक
रोशन कडू तिवसा
तिवसा शेतकरी सहकारी जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग सहकार क्षेत्रातील मंडळाची निवडणूक २९ मे रोजी होत आहे. सहकार क्षेत्रातील या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत ६६९ मतदार १७ सद्यस्थितीत निवडून देण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दोन संचालक अविरोध निवडून आले आहेत.
यामध्ये भटक्या विमुक्तमधून सुधीर गोंडसे तर इतर मागासवर्गीयमधून मनोहर साबळे हे अविराध निवडून आले आहेत.
सद्यस्थितीत ठाकूर गटाचे सहकारी पॅनेलचे ११ उमेदवार रिंंगणात आहेत. या विरोधात सर्वत्र राजकीय पक्षांनी एकजूट करून शेतकरी सहकारी पॅनेल उभे केले आहे. याच गटाचे दोन उमेदवार अविरोध निवडून आले असून १५ उमेदवार रिंंगणात आहेत.
संस्थेवर यापूर्वीदेखील लासणापुरे गटाची सत्ता होती. सद्यस्थितीत निवडूक रिंंगणात सहकार पॅनेलचे सर्वसाधारण मतदारसंघात संतोष काळे, सुदर्शन चरपे गजानन तिजारे, श्रीराम देशमुख, मुकुंद देशमुख, रामभाऊ लोकडे, तुळशीराम भोयर, विनोद वानखडे, सुरेश साबळे तर महिला राखीव मतदारसंघातून आशा श्रीकृष्ण राऊत व विमला साव असे ११ उमेदवार ठाकूर गटाचे रिंगणात आहे.
शेतकरी सहकारी पॅनेलचे सर्वसाधारण मतदारसंघातून मुकुंद लटारजी आमले, सुभाष खारकर, सुधाम गंधे, जयकृष्ण दिव, विवेक देशमुख, रवींद्र देशमुख, विजय देशमुख, अनिल पाटील, जयश्री बोके, सुधाकर राऊत, साहेबराव लसणापुरे, रबुनाथ वाडेकर रिंगणात असून महिला राखीव मतदारसंघातून अंजली खंडारे, संध्या तायवाडे तर अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघातून मनोज माहोरे असे १५ उमेदवार लसणापुरे गटाचे रिंंगणात आहेत.
याच गटाचे दोन उमदेवार अविरोध निवडून आलेले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाळासाहेब भटकर काम पाहत आहेत. निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.
सहकारातील या निवडणुकीकडे तालुक्याचे नेहमीच दुर्लक्ष राहिले आहे. गेल्या दोन दशकापासून लसनापुरे गटाचा एकछत्री अंमल या संस्थेवर होता.
मात्र काँग्रेसच्या ठाकूर गटाने यावेळच्या निवडणुकीत कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या निवडणुकीची चुरस वाढली आहे. यानिमित्ताने मतदारांना दोन्ही पॅनेलद्वारा आश्वासनांची खैरात वाटली जात असल्याचे ऐकिवात आहे.

Web Title: The bailouts of trusts in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.