महापालिकेवर बहुजन समाज पार्टीचा हल्लाबोल
By Admin | Updated: July 3, 2015 00:39 IST2015-07-03T00:39:51+5:302015-07-03T00:39:51+5:30
गरीब, दलित, झोपडपट्टीवासीयांच्या समस्या, प्रश्न सोडविण्याठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने महापालिकेवर गुरुवारी हल्लाबोल करण्यात आला.

महापालिकेवर बहुजन समाज पार्टीचा हल्लाबोल
अमरावती : गरीब, दलित, झोपडपट्टीवासीयांच्या समस्या, प्रश्न सोडविण्याठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने महापालिकेवर गुरुवारी हल्लाबोल करण्यात आला. वैयक्तिक शौचालय, रमाई घरकूल योजनेचा लाभ लाभार्थ्यांना त्वरित देण्याची मागणी करण्यात आली.
बसपाचे मंगेश मनोहरे यांच्या नेतृत्त्वात एक दिवसीय धरणे, निदर्शने व ढोल बजाओ आंदोलन करुन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान राजकमल चौक स्थित महापालिका प्रवेशद्वारासमोर धरणे देण्यात आले. या आंदोलनात संजय गांधीनगर, यशोदानगर, वडरपुरा या भागातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी आयुक्त गुडेवार यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत बसपाच्या गटनेत्या गुंफाबाई मेश्राम, मंगेश मनोहरे, नगरसेविका दीपमाला मोहोड, नगरसेवक दीपक पाटील, राजू बसवनाथे, गोपाल प्रधान, संजय वानखडे, भूषण खंडारे आदींनी दलित वस्त्यांमधील समस्या, प्रश्न मांडून आयुक्तांचे लक्ष वेधले. यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)