क्र ांती मोर्चातून बहुजनांचा हुंकार
By Admin | Updated: December 26, 2016 00:19 IST2016-12-26T00:19:13+5:302016-12-26T00:19:13+5:30
अॅट्रॉसिटी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसह दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यकांच्या न्याय,

क्र ांती मोर्चातून बहुजनांचा हुंकार
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अॅट्रॉसिटी कायदा कठोर करा
अमरावती : अॅट्रॉसिटी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसह दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यकांच्या न्याय, हक्कासाठी रविवारी क्रांती मोर्चाद्वारे बहुजनांनी हुंकार दिला. मोर्चातील सहा महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या नावे पाठविले.
येथील संविधान सन्मान समितीच्यावतीने बहुजन क्रांती मोर्चाला छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दुपारी दीड वाजता प्रारंभ करण्यात आला. स्थानिक सायन्सस्कोर मैदानातून निघालेला मोर्चा पुढे राजकमल चौक, जयस्तंभ चौक, इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौकातून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
यावेळी मोर्चाचे संयोजक राहुल मोहोड, जोगेंद्र मोहोड, कृष्णा गणवीर, सुनील गजभिये, किरण गुडधे, अमोल इंगळे, प्रभाकर घोडेस्वार, उत्तमराव भैसने, महेश तायडे आदींनी मोर्चाला संबोधित केले.
इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.
घोषणांनी आसमंत दणाणला
अमरावती : मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचल्यानंतर तहसीलदार सुरेश बगळे यांनी मोर्चातील काही महिला, पुरूषांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन सादर करण्यासाठी गेले. यावेळी काही मोर्चेकरांनी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:हून मोर्चासमोर येऊन निवेदन स्वीकारावे, अशी मागणी केली. परंतु पोलिसांनी सहा महिला व पुरूषांचे शिष्टमंडळाने निवेदन सादर करण्यासाठी जावे, अशी भूमिका घेतली. त्यानंतर दुपारी चार वाजताच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांना विविध १९ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी गित्ते यांना निलिमा पवार, स्हेनल आमटे, माया भिवगडे, संगीता मिसरे, प्रणाली खोब्रागडे, अनू वानखडे या महिलांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर करून बहुजनांच्या मागण्या मांडल्यात. यावेळी ‘एकच पर्व, बहुजन सर्व व अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी झालीच पाहिजे’ आदी नारेबाजी केली. यावेळी बळवंत वानखडे, वसू महाराज, प्रशांत कांबळे, केशव वानखडे, सुदाम बोरकर, प्रमोद गवई, सतीश भालेराव उपस्थित होते.