बहिरम ‘हाऊसफुल्ल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST2020-01-13T06:00:00+5:302020-01-13T06:00:31+5:30

बहिरमची यात्रा साधारणत: ३५० वर्षांपासून भरत आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेले ‘बहिरम बुवा’ हे लोकदैवत आहे. या ठिकाणाबाबत एक आख्यायिकाही आहे. शंकर-पार्वती प्रवास करीत असताना एकदा तेथे थांबले होते. त्यावेळी निसर्ग कुशीतील हे ठिकाण पार्वतीला आवडले. पार्वतीने शंकराला येथे दरवर्षी येण्याची गळ घातली.

Bahram 'Houseful' | बहिरम ‘हाऊसफुल्ल’

बहिरम ‘हाऊसफुल्ल’

ठळक मुद्दे३५० वर्षांचा इतिहास : दर्शनासाठी लागल्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा/चांदूरबाजार : सध्या बहिरम यात्रा भरात आली आहे. या यात्रेला लोकसंस्कृतीत आगळे महत्त्व आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या या यात्रेने १२ जानेवारीच्या रविवारी लाखोंची गर्दी अनुभवली. या गर्दीचे ‘मायला लेकरू भारी’ असे वर्णन केल्यास वावगे ठरणार नाही. रविवारची गर्दी व्यापारी, स्थानिकांना उभारी देणारी ठरली.
बहिरमची यात्रा साधारणत: ३५० वर्षांपासून भरत आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेले ‘बहिरम बुवा’ हे लोकदैवत आहे. या ठिकाणाबाबत एक आख्यायिकाही आहे. शंकर-पार्वती प्रवास करीत असताना एकदा तेथे थांबले होते. त्यावेळी निसर्ग कुशीतील हे ठिकाण पार्वतीला आवडले. पार्वतीने शंकराला येथे दरवर्षी येण्याची गळ घातली. त्यावर शंकराने माझा एक अंश नेहमीसाठीच या ठिकाणी ठेवतो, असे सांगितले. शंकराचे रुद्ररूप असलेले हे ठिकाण भैरवाचे ठिकाण म्हणून ओळखले जाऊ लागले. भैरवाचा अपभ्रंश होऊन कालांतराने हे स्थळ बहिरम नावाने ओळखले जाऊ लागले. त्या ठिकाणी शिव-पार्वतीने तीन दिवसांचा मुक्काम केल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे त्यांच्या स्नानासाठी दैवीशक्तीने खास काशीचे पाणी आणण्यात आले. त्या पाण्याचा इथला काशीतलाव प्रसिद्ध आहे. ज्या तलावातून पूर्वीच्या काळी भांडीकुंडी निघत होती, (ती भांडी घेतल्यानंतर ती परत करण्याची अट होती. काही व्यक्तींनी ती भांडी चोरून नेल्यामुळे तेथून भांडी येणे बंद झाल्याची आख्यायिका आहे.) तो भांडी तलावही येथे आहे; परंतु मृतावस्थेत आहे. येथे विश्वमित्र, कपिल ऋषींनी काही दिवस तप केल्याचेही सांगितले जाते, अशी ही पुरातन महत्त्व राखणारी ही बहिरम यात्रा जानेवारीच्या दुसºया आठवड्यात पूर्ण बहरावर आली आहे.

Web Title: Bahram 'Houseful'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.