सामाजिक अंतरावर व्यक्तीऐवजी ‘पिशव्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST2020-04-17T05:00:00+5:302020-04-17T05:00:31+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्यावतीने वारंवार सूचना देण्यात येत आहेत. विनाकारण घराबाहेर फिरू नये. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडल्यास नियमाचे पालन करावे व एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करु नये, अशा सूचना देण्यात येत आहे. या सूचनांचे दर्यापूर शहरात काही प्रमाणात पालन होत असल्याचे दिसून येत आहे.

सामाजिक अंतरावर व्यक्तीऐवजी ‘पिशव्या’
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्यावतीने वारंवार सूचना देण्यात येत आहेत. विनाकारण घराबाहेर फिरू नये. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडल्यास नियमाचे पालन करावे व एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करु नये, अशा सूचना देण्यात येत आहे. या सूचनांचे दर्यापूर शहरात काही प्रमाणात पालन होत असल्याचे दिसून येत आहे.
दर्यापूर येथे स्वस्त धान्य दुकानांमध्ये सकाळपासून धान्य घेण्यासाठी येत आहेत. त्याठिकाणी गर्दी होणार नाही, यासाठी नागरिकांनी आपल्या जागेवर पिशव्या ठेवून सोशल डिस्टन्ससिंगचे पालन केल्याचे पाहायला मिळत आहे.
एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही, यासाठी नागरिक आपापल्या जागांवर पिशव्या अन्य काही साहित्य ठेवून ती जागा राखीव ठेवून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात. जीवनाश्यक वस्तू घेण्यासाठी गर्दी करणाऱ्या नागरिकांबाबत अशा पद्धतीने शक्कल लढवली, तर गर्दी कमी होऊ शकेल व कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्याचा तो प्रयत्न असेल, अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.