बगाजी सागरचे ३१ दरवाजे उघडले

By Admin | Updated: July 28, 2016 00:03 IST2016-07-28T00:03:06+5:302016-07-28T00:03:06+5:30

तालुक्यात दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे बगाजी सागर धरणाचे बुधवारी ३१ दरवाजे २५ से़ मी. पर्यंत उघडले असून ....

Bagaji Sagar opened 31 doors | बगाजी सागरचे ३१ दरवाजे उघडले

बगाजी सागरचे ३१ दरवाजे उघडले

वर्धा नदीला पूर : २७ गावांना सतर्कतेचा इशारा
धामणगावरेल्वे: तालुक्यात दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे बगाजी सागर धरणाचे बुधवारी ३१ दरवाजे २५ से़ मी. पर्यंत उघडले असून ५७३ घनमिटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ वर्धा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या २७ गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे़
वर्धा, अमरावती दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या निम्न वर्धा प्रकल्पाचे (बगाजी सागर) ३१ दरवाज्याचे धरण आहेत़ दोन दिवसांपासून रात्रीला पडणाऱ्या पावसामुळे या धरणात २८०़ ६६ मिटर पाण्याची पातळी वाढली आहे़ अप्पर वर्धा प्रकल्पाचे दरवाजे उघडल्यानंतर त्या धरणाचे सोडलेले पाणी बगाजी सागर धरणात येते. पुढील २४ तासात पडणाऱ्या पावसाच्या शक्यतेमुळे अधीक पातळी वाढू नये, याची दखल घेत बगाजी सागर धरणाचे बुधवारी सकाळी दहा वाजता ३१ दरवाजे आहे़
या पावसाळ्यात पहिल्यांदा बगाजी सागर धरणाचे ३१ दरवाजे उघडल्यामुळे वर्धा नदी दुथळी वाहत आहे़ पुलगाव जवळील विठाळा मार्गावरील पूल पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे़ या परिसरातील २७ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे़ नदी काठावर कोणीही जावू नये, तसेच रात्रीला सतर्क रहावे, असे आवाहन तहसीलदार चंद्रभान कोहरे यांनी केले आहे़ ( तालुका प्रतिनिधी)

धरण परिसरात प्रवेशबंदी
गत दोन आठवड्यापूर्वी वरूड बगाजी येथील नंदू केशव कास्टे हा युवक धरणाच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे निम्न वर्धा प्रकल्पाच्या प्रशासकीय यंत्रणेने दखल घेवून पोलिसांना पत्र दिले आहे. धरण परिसरात कोणीही प्रवेश करू नये, याची दक्षता घ्यावी, असे पत्रात नमूद आहे.

बगाजी सागर धरणात पाण्याची पातळी वाढल्याने ३१ दरवाजे उघडण्यात आले आहे़ दोन दिवस या धरणातून पाण्याचा विसर्ग राहणार आहे़
डी़ जी़ रब्बेवार
कार्यकारी अभियंता, निम्न वर्धा

Web Title: Bagaji Sagar opened 31 doors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.