चालत्या एसटी बसमध्ये बॅग लिफ्टिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:13 IST2021-07-27T04:13:23+5:302021-07-27T04:13:23+5:30

अमरावती : धावत्या बसमध्ये प्रवासी महिलेच्या बॅगमधून पाच हजार रुपये चोरणाऱ्या चार महिलांना रंगेहाथ अटक करण्यात आली. चांदूर बाजार ...

Bag lifting in a moving ST bus | चालत्या एसटी बसमध्ये बॅग लिफ्टिंग

चालत्या एसटी बसमध्ये बॅग लिफ्टिंग

अमरावती : धावत्या बसमध्ये प्रवासी महिलेच्या बॅगमधून पाच हजार रुपये चोरणाऱ्या चार महिलांना रंगेहाथ अटक करण्यात आली. चांदूर बाजार ते अमरावती बसमध्ये वलगावनजीक सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास हा प्रकार घडला. एका प्रवासी महिलेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी त्या बॅग लिफ्टर महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींकडून पाच हजार रुपये जप्त करण्यात आले.

एसटी बस वलगावच्या पुढे असताना आपल्या बॅगमधून काही महिलांनी रक्कम चोरल्याचे एका प्रवासी महिलेच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केली. चालकाने बस थांबविली. मात्र, आरोपी महिलांनी उडवाउडवी केली. त्यामुळे चालकाने एसटी बस थेट गाडगेनगर पोलीस ठाण्यात आणली. पोलिसी हिसका बसताच त्या चार महिलांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर बस पुढे डेपोत आणली गेली.

Web Title: Bag lifting in a moving ST bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.