बडनेरच्या ‘ट्रामा केअर’ची पाहणी

By Admin | Updated: July 23, 2015 00:08 IST2015-07-23T00:08:43+5:302015-07-23T00:08:43+5:30

स्थानिक ‘ट्रामा केअर’ दवाखान्याची पाहणी मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सक अरूण राऊत यांनी केली.

Badner's 'Trauma Care' survey | बडनेरच्या ‘ट्रामा केअर’ची पाहणी

बडनेरच्या ‘ट्रामा केअर’ची पाहणी

गैरसोय : डॉक्टर, कर्मचारी नसल्याने रुग्णांचे हाल
बडनेरा : स्थानिक ‘ट्रामा केअर’ दवाखान्याची पाहणी मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सक अरूण राऊत यांनी केली. हा दवाखाना तत्काळ सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून या पार्श्वभूमीवरच त्यांनी ही पाहणी केली. दरम्यान त्यांनी मोदी दवाखान्यालादेखील भेट दिली.
या ‘ट्रामा केअर’ युनिटची इमारत उभी होऊन तब्बल अडीच वर्षांचा काळ लोटला आहे. दवाखान्यात उपचारासाठी लागणाऱ्या साहित्याची उपलब्धता असूनदेखील हा दवाखाना केवळ डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे सुरू झालेला नाही. या संदर्भात अनेकदा वृत्त प्रकाशित झाले. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक अरूण राऊत यांनी दवाखान्याची पाहणी करून लवकरच प्राथमिक स्वरुपात हा दवाखाना सुरू केला जाईल, अशी माहिती प्रस्तुत प्रतिनिधीला दिली. या दवाखान्याचा वीज पुरवठा गेल्या सहा महिन्यांपासून बंद करण्यात आला आहे. तो लवकरच सुरू केला जाणार आहे. तसेच पाण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. एक डॉक्टर व दोन परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून हा दवाखाना सुरू होईल, अशी माहिती राऊत यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Badner's 'Trauma Care' survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.