शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्याची लढत चौरंगीहून तिरंगी ? रवी राणा, प्रीती बंड, तुषार भारतीय यांच्यात काट्याची लढाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 11:26 IST

Amravati : सर्वच उमेदवारांची बोधचिन्हे नवी, राणांचा विजयी चौकार की नवा चेहरा?

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गेल्या १५ वर्षांपासून बडनेऱ्याची जागा जिंकून आमदारकीची हॅटट्रिक साधणारे अपक्ष आमदार रवी राणा हे चौथ्यांदा विजयाचा चौकार लगावण्यासाठी सर्वशक्तीनिशी रणमैदानात उतरले आहेत.

सोबतच, शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी सुनील खराटे यांना गेल्याने सन २०१९ मध्ये ४० टक्के मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या प्रीती बंड या अपक्ष म्हणून रिंगणात आहेत, तर भाजपच्या तिकिटासाठी आग्रही असलेले तुषार भारतीय यांनी अपक्ष म्हणून नामांकन कायम ठेवत बडनेऱ्याची लढत तिरंगी केली आहे. गेल्या १५ वर्षात मतदारसंघात केलेली विकासकामे, इझी अॅव्हेलिबिलिटी, आश्वासक चेहरा व अफाट जनसंपर्कासोबतच महायुतीची साथ विद्यमान आमदार रवी राणा यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. बसपा व वंचितचा फारसा प्रभाव अद्यापपर्यंत तरी यंदा दिसलेला नाही. 

लोकसभेवेळी आ. रवी राणा यांच्या बडनेरा मतदारसंघात भाजपच्या नवनीत राणा यांना तब्बल १,००,१२४ मते पडली होती. अर्थात आमदार रवी राणा यांनी पत्नी नवनीत यांना तब्बल २६ हजार ७६३ चे मताधिक्य दिले होते. त्यावेळी राणा यांच्यासमवेत भाजप व शिंदेसेना होती. विधानसभेत देखील भाजप व शिंदेसेनेचा रवी राणा यांना पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपची मते नेमकी कुणाच्या पारड्यात पडतात, यावर महायुतीच्या उमेदवाराचे यशापयश ठरेल. खासदार बळवंत वानखडे यांना बडनेरा मतदारसंघातून ७३ हजार ३६१ मते मिळाली होती. त्यावेळी उद्धवसेना व राकाँ (एसपी) त्यांच्यासोबत होती. त्यावेळी उद्धवसेनेच्या प्रीती बंड यांनी वानखडे यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले होते. मात्र, उमेदवारी ऐनवेळी खराटे यांच्याकडे गेल्याने उद्धवसेनेची मते विभागली जाण्याची दाट शक्यता आहे. सन २०१४ मध्ये भाजपचे तिकीट ऐनवेळी घोषित झाल्यानंतरही तुषार भारतीय यांनी तब्बल ३१,४५५ मते घेतली होती. त्यानंतर गेली दहा वर्षे भारतीय यांनी बडनेरा मतदारसंघाशी जुळलेली नाळ कायम ठेवली. त्यामुळे अपक्ष म्हणून रिंगणात असलेल्या तुषार भारतीय यांची उमेदवारी दखलनीय ठरली आहे. स्थानिक भाजपसह जुण्या जाणत्या भाजपाईची भूमिकादेखील रवी राणा व तुषार भारतीय या दोघांसाठी देखील तितकीच महत्त्वाची ठरणार आहे.

महायुती, आघाडीच्या मित्रपक्षांकडेही लक्ष, युतीधर्म पाळणार? भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गट हे प्रमुख पक्ष असलेल्या महायुतीने बडनेयाची जागा युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवि राणा यांच्यासाठी सोडली आहे. त्यामुळे ते महायुतीचे संयुक्त उमेदवार ठरले आहेत. तर सुनिल खराटे यांच्यासोबत काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार हे मुख्य घटक पक्ष आहेत. त्यामुळे या घटकपक्षांवरही या दोन्ही उमेदवारांची भिस्त असेल. तर दुसरीकडे, प्रिती बंड यांच्यासाठी अनेक अनामिक हात पुढे सरसावल्याचे चित्र आहे. भाजपचे बंडखोर ज्या मुशी घडले, त्या जुन्या जाणत्या व केंडर बेस व्होटिंगवरही यशापयश ठरणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ravi Ranaरवी राणाAmravatiअमरावतीBadneraबडनेरा