बडनेरा रस्ता ९० कोटी खर्चून सिमेंट क ाँक्र ीटचा बनणार
By Admin | Updated: July 13, 2015 00:30 IST2015-07-13T00:30:59+5:302015-07-13T00:30:59+5:30
अमरावती-बडनेरा चौपदीकरण हा रस्ता ९० कोटी रुपये खर्चून सिमेंट काँक्रीटने सुसज्ज करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत घेण्यात आला.

बडनेरा रस्ता ९० कोटी खर्चून सिमेंट क ाँक्र ीटचा बनणार
रवी राणा यांचा पुढाकार: सार्वजनिक बांधकाम विभागात बैठक
अमरावती : अमरावती-बडनेरा चौपदीकरण हा रस्ता ९० कोटी रुपये खर्चून सिमेंट काँक्रीटने सुसज्ज करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत घेण्यात आला. त्याकरिता केंद्र व राज्य शासनाकडून युद्धस्तरावर निधी खेचून आणला जाईल, असे आ. रवी राणा यांनी मान्य केले. यावेळी बडनेरा मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
येथील सार्वजनिक बांधकाम विभागात आ.रवी राणा यांच्या अध्यक्षस्थानी पार पडलेल्या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विजय बनगिनवार, कार्यकारी अभियंता प्रशांत खलाटे, जाधव, उपकार्यकारी अभियंता नितीन देशमुख, महापालिकेचे शहर अभियंता जीवन सदार, भास्कर तिरपुडे, उद्यान अधिक्षक प्रमोद येवतीकर, शाखा अभियंता माळोदे, सहायक अभियंता सोनोने, उपकार्यकारी अभियंता जवंजाळ, अरविंद काळमेघ, कार्यकारी अभियंता संतोष जाधव, आत्राम, उमेश ढोणे आदी उपस्थित होते. यावेळी आ. राणा यांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर विकास कामांवर मंथन करताना कामाचे उद्घाटन, भूमिपूजन, बजेटमध्ये मंजूर कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. रस्ते दुरुस्ती, बैठकीत सुनील राणा, विनोद जायलवाल, हर्षद वाचासुंदर, आशिष गावंडे, नितीन हिरुळकर, अमर तरडेजा आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)