शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

बडनेरा, अमरावतीची मतदारसंघाची मतमोजणी होणार लोकशाही भवनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 11:36 IST

वाहतूक शाखेने काढली अधिसूचना : बियाणी ते विद्यापीठ चौक मार्गाची वाहतूक बंद

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती :बडनेराअमरावती विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी मार्डी रोडस्थित लोकशाही भवन येथे सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. ही मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना लोकशाही भवन परिसरात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून २३ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजतापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपावेतो बियाणी चौक ते विद्यापीठ चौक या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची अधिसूचना वाहतूक शाखेने काढली आहे.

बियाणी चौक ते तपोवन गेटपर्यंतची वाहतूक बंद राहणार असल्याने पोलिस प्रशासनाने पर्यायी मार्गदेखील जाहीर केले आहेत. माडी मार्गे येणाऱ्या तसेच तपोवन गेट परिसरातील निवासी वसाहतीतील वाहनचालकांना अमरावती शहरात येण्याकरिता अंध विद्यालय, विद्यापीठ चौक, रचना सृष्टी, विक्रांत लॉन, दंत महाविद्यालय, चपराशीपुरा, वडाळी, ओवरब्रीज हा पर्यायी मार्ग असेल. बियाणी चौक येथून मार्डी रोडकडे तसेच तपोवन परिसरातील निवासी वसाहतीत जाणाऱ्या वाहनचालकांना बियाणी चौक, चपराशीपुरा, अंध विद्यालय, वडाळी, ओवरब्रीज चौक, दंत महाविद्यालय हा मार्ग असेल. बियाणी चौक ते विद्यापीठ चौक मार्गावरील चिलमछावणी, व्यंकव्यापुरा, जिजाऊनगर, ओम कॉलनी रहिवासी वाहनचालकांनी मुख्य मार्गावर प्रवेश बंद राहणार असल्याने त्यांनी परिसरातील उपलब्ध पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवनेरी कॉलनी, पंकज कॉलनी परिसरातील रहिवासी नागरिक व या मार्गावरील कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग कार्यालयातील कर्मचारी यांना पर्यायी मार्ग नसल्याने त्यांनी आपल्या वाहनाने कार्यालय, निवासस्थानी ये-जा करण्यासाठी आवश्यक वेळी बियाणी चौकाकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करावा. सूट देण्यात आलेल्या निवासी नागरिकांनी रहिवास पुरावा तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सोबत कार्यालयीन ओळखपत्र सोबत बाळगावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

"या अधिसूचनेचे जो कोणी वाहनचालक पालन करणार नाही, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. आदेशात नमूद निर्बंधाचे सर्व वाहनचालकांनी काटेकोरपणे पालन करून पोलिस विभागास आवश्यक सहकार्य करावे. ही अधिसूचना शनिवार सकाळी सहापासून मतमोजणी होईपर्यंत लागू असेल." -कल्पना बारवकर, पोलिस उपायुक्त

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४amravati-acअमरावतीbadnera-acबडनेराAmravatiअमरावती