बडनेरात रंगली कलश सजावट, रांगोळी स्पर्धा
By Admin | Updated: October 20, 2015 00:20 IST2015-10-20T00:20:12+5:302015-10-20T00:20:12+5:30
‘लोकमत’ सखी मंच व पवनसूत दुर्गोत्सव मंडळाच्यावतीने बडनेरा येथे सखींसाठी कलश सजावट व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली

बडनेरात रंगली कलश सजावट, रांगोळी स्पर्धा
‘लोकमत’ सखींसाठी आयोजन : ‘वन मिनिट गेम शो’चा ही घेतला आस्वाद
अमरावती : ‘लोकमत’ सखी मंच व पवनसूत दुर्गोत्सव मंडळाच्यावतीने बडनेरा येथे सखींसाठी कलश सजावट व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यावेळी सखींसाठी ‘वन मिनिट गेम शो’चे आयोजनही करण्यात आले होते. सखींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग घेतला.
कलश सजावट व रांगोळी स्पर्धेत चौरंगावर मांडलेले सुरेख कलश आकृष्ट करीत होते. सखींनी त्यांच्यातील कलात्मकतेचा परिचय देत हे कलश तयार केले होते. यामध्ये सखींनी मणी, टिकल्या, फुले, पाने, चुनरी आदींचा उपयोग करून कलश सजावट केली. अश्विनी आंडे यांनी प्रथम, संध्या चंदोकार यांनी द्वितीय तर अर्चना ठाकरे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. शीला नरजे, वैशाली मैनूर, रितिका गावंडे व आर्टिफिशियल कलशमध्ये मंदा डहाके यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. रांगोळी स्पर्धेत सोनाली साठे प्रथम, विशाखा झरबडे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. 'वन मिनिट गेम शो'मध्ये विभा चौधरी, ज्योती हजारे, कांता खिंंवसरा यांनी बक्षिसे पटकावलीत. यामध्ये पवनसूत दुर्गोत्सव मंडळाच्या शालिनी गुल्हाने, पद्मा पहुरकर, वर्षा महाडिक, उज्ज्वला नागदिवे, देवकन्या माहुले, विमल दरोकार, सुमन गाढीबांधे, पुष्पा पुनसे, नम्रता निनावे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आयोजन सखीमंचच्या तृप्ती पडोळे, भारती बोकरिया व कांता खिंवसरा यांनी केले होते. (प्रतिनिधी)