शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

परतवाडा-अकोट रस्ता जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 01:25 IST

गत वर्षभरापासून सुरू असलेल्या परतवाडा-अकोट रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात दिवसभर तुरळक अपघातांची मालिका सुरू आहे. वळण मार्गावर आवश्यक त्या सुविधा कंत्राटदार व संबंधित कंपनीने रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसाठी केल्या नाहीत.

ठळक मुद्देअपघातांची मालिका : निर्माणाधीन मार्गावर युवकाचा बळी, प्रहारतर्फे पाच दिवसांचा अल्टिमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : गत वर्षभरापासून सुरू असलेल्या परतवाडा-अकोट रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात दिवसभर तुरळक अपघातांची मालिका सुरू आहे. वळण मार्गावर आवश्यक त्या सुविधा कंत्राटदार व संबंधित कंपनीने रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसाठी केल्या नाहीत. त्यामुळे दररोज रस्त्याने अपघात घडत आहेत. पाच दिवसांत रस्ता दुरुस्तीचे काम न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहार पक्ष संघटनेने देण्यात आला आहे.पथ्रोट नजीकच्या गणोरकर विद्यालयाजवळ दोन महिन्यापूर्वी अंजनगाव शाळेत मुलांना भेटण्यासाठी जाणाºया आदिवासी दाम्पत्याचा दुचाकीला खराब रस्त्यांमुळे अपघात झाला. त्यामध्ये मागून येणाºया ट्रकने महिलेस चिरडले होते. मंगळवारी रात्री ८ वाजता पुलासाठी खोदकाम केलेल्या खड्ड्यात दुचाकीसह पडून बंटी पवारचा मृत्यू झाला. कंत्राटदार रस्त्यांवर पाणी टाकत नसल्याने दिवसभर धुळीचे साम्राज्य असते. त्यामुळे दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा महामार्ग ठरला आहे. परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन दररोज ये-जा करतात. तरीसुद्धा संबंधित अधिकारी व कंत्राटदार रस्ता बांधकामात नियम धाब्यावर बसून कामे करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रात्रीला स्पष्ट दिसणारे रेडियमचे दिशादर्शक, खड्ड्याच्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था आदी सर्व नियमानुसार करण्यात आले नाहीत. त्यामुळे बंटी पवारचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या कंत्राटदार व कंपनीच्या संचालकांना अटक करण्याची मागणी प्रहार पक्ष संघटनेतर्फे करण्यात आली आहे.बंटीवर अंत्यसंस्कारमंगळवारी रात्री अपघातात मृत झालेला प्रहार कार्यकर्ता बंटी पवार याच्यावर बुधवारी सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेकडोंच्या संख्येने प्रहार कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.रस्ता चौपदरीकरण कामात नियमानुसार आवश्यक त्या सुविधा सूचनांचे पालन संबंधित कंपनी व कंत्राटदाराने केले नाही. त्यामुळे अपघात होऊन जीव जात आहेत. पाच दिवसांत दुरुस्ती न झाल्यास प्रहारचा दणका दाखवू- आमदार बच्चू कडूअचलपूर विधानसभा मतदारसंघ

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक