अनुशेष : सिंचन निधी द्या
By Admin | Updated: January 31, 2015 23:10 IST2015-01-31T23:10:46+5:302015-01-31T23:10:46+5:30
विदर्भात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांसाठी सिंचनाचा अनुशेषदेखील तेवढाचा कारणीभूत आहे. विदर्भाचा हक्काचा निधी पश्चिम महाराष्ट्राने पळविला. परिणामी राज्यपालांनी दिलेल्या

अनुशेष : सिंचन निधी द्या
लोकप्रतिनिधींचे साकडे : जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांकडे मागणी
अमरावती : विदर्भात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांसाठी सिंचनाचा अनुशेषदेखील तेवढाचा कारणीभूत आहे. विदर्भाचा हक्काचा निधी पश्चिम महाराष्ट्राने पळविला. परिणामी राज्यपालांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सिंचनाचा निधी मिळावा, अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील आमदारांनी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांचेकडे शनिवारी केली.
मालिनी शंकर या अमरावतीत जलसंपदा विभागाचा आढावा घेण्यासाठी आल्या असता त्यांना निवेदनातून सिंचनाचा अनुशेष दूर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली. दरम्यान चर्चा करताना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने काढलेला भौतिक अनुशेष दूर करण्यासाठी विभागाला ३५५४४ कोटी रूपये एवढा आहे. तो कायद्याने मिळणे हा विभागाचा अधिकार आहे, असे आमदारांनी सांगितले.