शिक्षण व्यस्थापनाचा कणा झाला कमकुवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:12 IST2021-03-07T04:12:51+5:302021-03-07T04:12:51+5:30

अमरावती : जिल्हा परिषदेंतर्गत शाळांमध्ये विषय पदवीधर शिक्षक, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांची शेकडो पदे रिक्त ...

The backbone of education management has become weak | शिक्षण व्यस्थापनाचा कणा झाला कमकुवत

शिक्षण व्यस्थापनाचा कणा झाला कमकुवत

अमरावती : जिल्हा परिषदेंतर्गत शाळांमध्ये विषय पदवीधर शिक्षक, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांसह शिक्षण विभागाच्या व्यवस्थापनाचा कणा कमकुवत झाला आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता ६ वी ते ८ वीकरिता विषय पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करावयाची असून, फेब्रुवारी २०१८ नंतर अशा नियुक्ती करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आज भाषा, विज्ञान व समाजशास्त्र या तिन्ही संवर्गातील विषय शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. दुसरीकडे उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची पदेसुद्धा रिक्त आहेत. केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या रिक्त पदावर काही वर्षांपासून पदोन्नतीच झालेल्या नाहीत. शाळांप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अवस्था बिकट आहे. प्राथमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी यांची २ पदे मंजूर आहे. पैकी १ पद रिक्त आहे. गटशिक्षणाधिकारी यांची १४ ही पदे रिक्त आहेत. पंचायत समितीत प्रभारी गटशिक्षणाधिकारी कारभार हाकत आहे. केंद्रप्रमुखांची १३९ पैकी १००, तर शिक्षण विस्तार अधिकारी यांची ५७ पैकी ३५ पदे रिक्त आहेत. पात्र मुख्याध्यापकांची २२३ पैकी १०० पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांचा सनियंत्रण व पर्यवेक्षीय यंत्रणेवर विपरीत परिणाम होत असून, पर्यायाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शैक्षणिक गुणवत्तेवरसुद्धा त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत, सरचिटणीस संभाजी रेवाळे, राजेश सावरकर आदींनी केली आहे.

शिक्षण विभाग रिक्त पदे

उपशिक्षणाधिकारी मंजूर-०२, कार्यरत-०१, रिक्त पद-०१, गटशिक्षणाधिकारी मंजूर पदे-१४ कार्यरत-००, रिक्त पदे-१४, शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी २, मंजूर-३७, कार्यरत-१४, रिक्त पदे-२३, श्रेणी -३, मंजूर -२०, कार्यरत-०८, रिक्त पदे-१२, एकूण मंजूर पदे-५७, कार्यरत पदे-२२, रिक्त पदे आहेत.

बॉक्स

शाळांची स्तरावरची रिक्त पदे

३५,केंद्र प्रमुख-सरळ सेवा मंजूर -५६, कार्यरत-००, रिक्त पदे-५६ परीक्षेने मंजूर-४१, कार्यरत-००, रिक्त पदे-४१, पदोन्नतीने मंजूर-४२ कार्यरत-३९, पदोन्नती -०३, एकूण पदे-मंजूर -१३९, कार्यरत -३९, रिक्त पदे-१००,उच्च श्रेणी मुख्याध्यापक मंजूर-२२३, कार्यरत -१२३, रिक्त पदे-१००, विषय शिक्षक भाषा मंजूर पदे-५०३, कार्यरत -४१३, रिक्त पदे -९०, विज्ञान -मंजूर -५२५ कार्यरत -४१०, रिक्त पदे -११५ सामाजिकशास्त्र मंजूर पदे-१५५, कार्यरत -१००, रिक्त पदे -०५५, सहायक शिक्षक मंजूर पदे-३८१६, कार्यरत -३३९६, रिक्त पदे -४२० मुख्यालय शिक्षण विस्तार अधिकारी रिक्त पदे मंजूर पदे -०५, कार्यरत -०२, रिक्त पदे -०३ आहेत.

Web Title: The backbone of education management has become weak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.