शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या नेहरू मैदानात 'मै झुकेगा नही' वेधतेय लक्ष; बच्चू कडू यांची शक्ती प्रदर्शनाची तयारी

By गणेश वासनिक | Updated: November 1, 2022 13:28 IST

या मेळाव्यात बच्चू कडू नेमकं काय बोलतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

अमरावती : खोके आणि किराणा वाटपावरून गत आठवड्यात आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या झालेला वाद काही अंशी शमला. मात्र बच्चू कडू यांनी जशास तसे उत्तर देण्यासाठी अमरावतीच्या नेहरू मैदानावर मंगळवारी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित केला आहे. त्याकरिता राज्यभरातून प्रहारचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.

रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर रवी राणा, बच्चू कडू यांच्यात मनोमिलन झाले. रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली व्यक्त केली. मात्र 'खोके' हा शब्द आमदार बच्चू कडू यांचे जिव्हारी लागला असून यासंदर्भात प्रहारचे कार्यकर्ते अंतिम निर्णय घेतील, असा निर्धार त्यांनी केला आहे. त्या अनुषंगाने अमरावतीच्या नेहरू मैदानावर आज प्रहारचा मेळाला आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी बच्चू कडू हे सरकारमध्ये राहायचे की बाहेर पडायचे किंवा तटस्थ राहायचे याविषयी निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

मेळाव्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते, पदाधिकारी गोळा होत आहेत. दुपारी २ च्या मेळाव्याला आमदार बच्चू कडू मार्गदर्शन करतील. मात्र टाऊन हॉल परिसरात बच्चू कडू यांचे लागलेले पोस्टर अनेकांचे लक्ष वेधत आहे. त्यावर मै झुकेगा नही'  कॅश लाईन असून प्रशासनाने देखील त्याची दखल घेतली आहे. त्यामुळे या मेळाव्यात बच्चू कडू नेमकं काय बोलतात सर्वांच लक्ष लागलं आहे.  आमदार रवी राणा यांचे निवासस्थान, कार्यालयावर पोलीस बंदोबस्त

आमदार बच्चू कडू यांनी नेहरू मैदान येथे आयोजित केलेल्या प्रहारच्या मेळाव्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने आमदार रवी राणा यांचे 'गंगासावित्री' निवासस्थानी आणि राजापेठ उडाण पूला जवळील युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. राजापेठ व शहर कोतवालीचे पोलीस प्रशासन बच्चू कडू यांचा मेळावा आणि रवी राणा यांच्या निवासस्थान, कार्यालयाची सुरक्षा हाताळत आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणBacchu Kaduबच्चू कडूRavi Ranaरवी राणाAmravatiअमरावती