शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंचा महायुतीला 'दे धक्का'; राणांविरुद्ध 'प्रहार'कडून दिनेश बुब यांना उमेदवारी

By गणेश वासनिक | Updated: March 29, 2024 23:31 IST

राजकुमार पटेल यांनी पत्रपरिषदेतून माहिती, महायुतीने आमचे म्हणणे ऐकूण न घेतल्याचा आक्षेप

अमरावती : महायुतीचे घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी खासदार नवनीत राणांचा प्रचार करणार नाही. प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांची तशी भावना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वस्तुस्थिती सांगितली आहे. प्रसंगी महायुतीतून बाहेर पडू पण राणांसाठी मत मागणार नाही, अशी रोखठोक भूमिका गत काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी मांडली होती. अखेर शुक्रवारी महायुतीला धक्का देत प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे महायुतीतील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे.

भाजपने नवनीत राणा यांना अमरावतीची उमेदवारी जाहीर करताच आमदार बच्चू कडू यांनी कमालीची नाराजी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केली होती. महायुतीचे घटक असलो तरी लाचारी पत्करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिव्यांगाच्या भल्यासाठी गेलो आहे. मात्र गत काही वर्षात आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांची वागणूक ही अपमानास्पद राहिली आहे. आम्ही कोणाचे काहीही ऐकूण घेणारे नाही. स्वाभिमान अद्यापही गहाण ठेवला नाही. त्यामुळे काहीही झाले तरी नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका आमदार बच्चू कडू यांनी घेतली होती. या भूमिकेशी सुसंगत राहण्यासाठी प्रहार पक्षाचे नेते आमदार राजकुमार पटेल, बल्लू जवंजाळ, माजी नगराध्यक्ष अब्दूल रहेमान यांच्या उपस्थितीत शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दिनेश बुब यांना प्रहार पक्षाच्यावतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली.राजकुमार पटेल यांनी केली बुब यांच्या नावाची घोषणापत्रपरिषदेत प्रहारचे आमदार राजकुमार पटेल म्हणाले की प्रहारच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. अमरावतीत संघटनेने उमेदवार द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. माझ्यावर बच्चू कडूंनी जबाबदारी सोपविली. अमरावतीत मैत्रीपूर्ण लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. दिनेश बुब यांनी निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला. अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्रहारचे उमेदवार बुब असतील अशी घोषणा आमदार पटेल यांनी यावेळी केली.प्रहारचे दोन आमदार, एक लोकसभेची जागा मागितलीदिनेश बूब हे इच्छुक उमेदवार होते. शिवसेना ठाकरे गटाने ही जागा काँग्रेसला दिली. दिनेश बुब यांना प्रहारचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवत आहे. अमरावती जिल्ह्यात प्रहारचे दोन आमदार आहेत. आम्हाला लोकसभेची एक जागा हवी होती. महायुतीत आम्ही एक जागा मागितली तर चुकीचे काय? पक्ष वाढावा असे सगळ्यांनाच वाटते, असे आमदार राजकुमार पटेल म्हणाले.माझ्यासमोर दोन उमेदवार असून ते विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत. सरकारी पैशातून श्रेयवादाचे बॅनर्स लावणे हे मला पटत नाही. मी आतापर्यंत कोटींची विकास कामे केले, पण कुठेही माझ्या नावाचा फलक लावला नाही. विकासकामे होत राहतील पण समाजा-समाजामध्ये दरी निर्माण होत आहे. ही दरी दूर करण्यासाठी लोकसभा निवडणूक रिंगणात आहे.- दिनेश बुब, प्रहारचे उमेदवार

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाBachhu Kaduबच्चू कडूlok sabhaलोकसभाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४