रक्तदानाने बाबूजींना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:31 IST2018-07-02T23:30:58+5:302018-07-02T23:31:15+5:30

‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा स्वातंत्र्य संग्राम सेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबुजी यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त येथील ‘लोकमत’ विभागीय कार्यालय आणि वरूड येथे सोमवारी रक्तदान शिबिर पार पडले. बाबुजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून रक्तदानाला सुरुवात करण्यात आली. रक्तदानासाठी 'लोकमत'ला गाडगेबाबा रक्तपेढी अ‍ॅन्ड कम्पोनंट सेंटरचे सहकार्य लाभले. वरूड येथे रक्तदान

Babuji honored with blood donation | रक्तदानाने बाबूजींना आदरांजली

रक्तदानाने बाबूजींना आदरांजली

ठळक मुद्देअमरावती, वरूड : संत गाडगेबाबा, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा स्वातंत्र्य संग्राम सेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबुजी यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त येथील ‘लोकमत’ विभागीय कार्यालय आणि वरूड येथे सोमवारी रक्तदान शिबिर पार पडले. बाबुजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून रक्तदानाला सुरुवात करण्यात आली. रक्तदानासाठी 'लोकमत'ला गाडगेबाबा रक्तपेढी अ‍ॅन्ड कम्पोनंट सेंटरचे सहकार्य लाभले.
वरूड येथे रक्तदान
वरूड येथील ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न रक्तदाता संघ व डॉ.हेडगेवार रक्तपेढी यांच्या सहकार्याने वरूड शहरातही रक्तदान शिबिर पार पडले. ग्रामीण रुग्णालयात आयोजित सदर शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार, पंकज लेकुरवाळे, सचिन परिहार, अतुल काळे, चरण सोनारे, पंकज केचे, प्रवीण खासबागे, तसेच टीम ‘लोकमत’चे संजय खासबागे, देवेंद्र धोटे, सतीश बहुरूपी, गजानन नानोटकर, प्रशांत काळबांडे, जयप्रकाश भोंडेकर, त्रिनयन मालपे, नंदकिशोर निंभोरकर, विकास हिवरकर, मनीष चोपडे, महेश कथलकर, रवींद्र टेकाडे, योगेश फुटाणे, मनोज नेरकर, राजेंद्र घाटोळे आदी उपस्थित होते.

Web Title: Babuji honored with blood donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.