इर्विन चौकात साकारणार बाबासाहेबांचे स्मारक
By Admin | Updated: April 14, 2016 00:03 IST2016-04-14T00:03:23+5:302016-04-14T00:03:23+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे शतकोत्तरी जयंती वर्ष आहे. उद्या १४ एप्रिल रोजी या निमित्ताने जंगी कार्यक्रमांचे आयोेजन करण्यात आले आहे.

इर्विन चौकात साकारणार बाबासाहेबांचे स्मारक
३.४० कोटी जमा : शतकोत्तरी जयंती वर्षातील आनंदवार्ता
अमरावती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे शतकोत्तरी जयंती वर्ष आहे. उद्या १४ एप्रिल रोजी या निमित्ताने जंगी कार्यक्रमांचे आयोेजन करण्यात आले आहे. त्यात जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या पुढाकाराने इर्विन चौकात आंबेडकरांचे स्मारक साकारण्यासाठी जमीन अधिग्रहणाचा मार्ग मोकळा झाल्याने आंबेडकर अनुयायांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. या स्मारकाकरिता ३.४० कोटी रुपयांचा धनादेश बुधवारी प्रशासनाच्या सुपूर्द करण्यात आला.
इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यदिव्य स्मारक व्हावे, अशी आंबेडकर अनुयायांची मागील अनेक दिवसांपासूनची मागणी होती. त्यानुसार सन २०१५ मध्ये १४ एप्रिल रोजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने स्मारक निर्मितीची घोषणा करण्यात आली होती.
२८ नगरसेवकांनी दिला निधी
अमरावती : जमीन अधिग्रहणासाठी लागणारी रक्कम लोकप्रतिनिधी, प्रशासनस्तरावर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला होता. पहिल्या टप्प्यात पालकमंत्री पोटे यांनी त्यांच्या मातोश्री सूर्यकांतादेवी पोटे यांच्या नावे २५ लाख रुपयांची देणगी देण्याचे जाहीर केले होते. एकूण जमीन अधिग्रहणासाठी ३ कोटी ४० लाख रुपये एवढी रक्कम आवश्यक होती. अल्पावधीत इतकी रक्कम गोळा करणे जिकरीचे काम होते. तथापि नगरसेवक प्रदीप दंदे यांनी पुढाकार घेत पाच लाख रुपये याप्रमाणे महापौरांसह २८ नगरसेवकांकडून स्मारक जमीन अधिग्रहणासाठी निधी गोळा केला. प्रारंभी २.४० कोटी रुपये गोळा झाले.