पथनाट्यातून कोरोना संसर्गाची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:36 IST2021-01-08T04:36:53+5:302021-01-08T04:36:53+5:30
रेझिंग डे : रेल्वे पोलिसांचा पुढाकार बड़नेरा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, हे ‘महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे’निमित्त ...

पथनाट्यातून कोरोना संसर्गाची जनजागृती
रेझिंग डे : रेल्वे पोलिसांचा पुढाकार
बड़नेरा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, हे ‘महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे’निमित्त बडनेरा रेल्वे स्थानकावर पथनाट्यातून प्रवाशांसमोर मांडण्यात आले. रेल्वे पोलिसांचा यात पुढाकार होता.
नागपूर येथील पोलीस अधीक्षक (लोहमार्ग) एम. राजकुमार यांच्या संकल्पनेतून बडनेरा रेल्वे पोलीस व दिशा फाउंडेशन चाईल्ड लाईन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना संसर्ग कसा टाळावा, याची माहिती पथनाट्यातून प्रवासी, रेल्वे कर्मचारी, सफाई कामगार, कुली, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सहायक पोलीस निरीक्षक अजितसिंह राजपूत यांनी केले. यावेळी रेल्वे पोलीस ठाण्याचे कर्मचारीदेखील उपस्थित होते. नावीन्यपूर्ण व सध्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणाऱ्या या पथनाट्याचे रेल्वे प्रवाशांकडून स्वागत केले गेले.