विद्यापीठात पुरस्कार सोहळा

By Admin | Updated: December 22, 2016 00:38 IST2016-12-22T00:38:09+5:302016-12-22T00:38:09+5:30

शिक्षणाबरोबरच सामाजिक वातावरण निर्माण कणे हे विद्यापीठाचे दायित्व आहे. समाजासाठी आयुष्य झोकून काम करणाऱ्या ...

Award Ceremony at the University | विद्यापीठात पुरस्कार सोहळा

विद्यापीठात पुरस्कार सोहळा

कुलगुरुंच्या हस्ते वितरण : हेमंतकुमार भालेराव यांना सामाजिक पुरस्कार प्रदान
अमरावती : शिक्षणाबरोबरच सामाजिक वातावरण निर्माण कणे हे विद्यापीठाचे दायित्व आहे. समाजासाठी आयुष्य झोकून काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्यापासून समाजाला प्रेरणा मिळावी म्हणून या पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ करत असून अशा कार्यक्रमांमधून सामाजिक चळवळ उभी व्हायला हवी, असे प्रतिपादन कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी केले.
अमरावती विद्यापीठातर्फे दिल्या जाणारा कै. नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृतीप्रित्यर्थ संत गाडगेबाबा सामाजिक कार्य पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकारच्या वने, पर्यावरण व वातावरण मंत्रालयाचे माजी उच्चस्तरीय सल्लागार समिती सदस्य चेतराम पवार, कुलसचिव अजय देशमुख, बीसीयूडीचे संचालक राजेश जयपुरकर, भय्यासाहेब मेटकर, प्राचार्य नीलेश गावंडे, हेमंतकुमार भालेराव, दिलीप हांडे, अनिल घोम व विलास नांदूरकर व्यासपीठावर उपस्थित होते.
याकार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते हेमंतकुमार भालेराव यांना संत गाडगेबाबा सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. दहा हजार रोख, सन्मानचिन्ह प्रमाणपत्र शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आला. पर्यावरणाच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा स्थित भास्करराव शिंगणे कला, नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयाला विद्याीठाचा पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राचार्य नीलेश गावंडे यांना १५ हजार रोख सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक अजय देशमुख यांनी तर पुरस्काराची भूमिका राजेश जयपूरकर यांनी मांडली. यावेळी भय्यासाहेब मेटकर, हेमंतकुमार भालेराव आणि नीलेश गावंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर तर आभार प्रदर्शन अनिल घोम यांनी केले.
कार्यक्रमाला गणेश पाटील, जयकिरण तिडके, विद्यालक्ष्मी मेटकर, जयंत वडते, शशीकांत आस्वले, एम.टी. देशमुख, श्रीकांत पाटील, आर.डी. सिकची आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Award Ceremony at the University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.