शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

अमरावती विभागातील १० तालुक्यांत सरासरी ६० टक्केपेक्षा कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 18:27 IST

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात सरासरीच्या ५०.२ टक्के पाऊस झाला.

अमरावती - विभागातील पाचही जिल्ह्यात सरासरीच्या ५०.२ टक्के पाऊस झाला. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक, तर यवतमाळ जिल्हा माघारला आहे. विभागातील ५६ तालुक्यांपैकी १० तालुक्यांत अर्धा पावसाळा संपला असताना सरासरी ६० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.अमरावती विभागात १ जून ते ७ आॅगस्ट दरम्यान सरासरी ४५४.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना ३८२.७ मिमी पाऊस झाला आहे, याची टक्केवारी ५०.२ इतकी आहे. बुललाडा जिल्ह्यात  १३ ही तालुक्यांची स्थिती चांगली असून, सरासरी ३८४.४ मिमी ऐवजी ४०६ मिमी म्हणजेच १०५.६ टक्के पाऊस झालेला आहे. अकोला जिल्ह्यात सात तालुक्यांत सरासरी ४०७.८ मिमी ऐवजी ४१३.५ मिमी पाऊस झाला आहे. याची टक्केवारी १०१.४ इतकी आहे. बार्शी टाकळी तालुक्यात ३९७.१ मिमीऐवजी ४६१.१ मिमी पाऊस पडला. याची टक्केवारी ११६.१ इतकी आहे. वाशीम जिल्ह्यात सरासरी ४६९.४ मिमीऐवजी ३१३.७ मिमी पावसाची नोंद झाली. याची टक्केवारी ६६.८ इतकी आहे.पाचही तालुक्यांपैकी सरासरीच्या ५० टक्केपेक्षा कमी पाऊस कारंजा तालुक्यात ५४.६ मिमी झाला आहे. तसेच अमरावती जिल्ह्यात सरासरी ४७२.१ मिमीऐवजी ४४६.९ मिमी पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे. याची टक्केवारी९४.७ इतकी आहे. यामध्ये चांदूर बाजार व चांदूर रेल्वे तालुक्यात ११७.५ टक्के सर्वाधिक पावसाची नोंद झाली, तर भातकुली तालुक्यात ५८.१ टक्के पाऊस झाला आहे.सरासरीच्या ६० पेक्षाही कमी पाऊस तेथे झालेला आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यात सरासरी ५३८.८ मिमीपैकी ३३३.१ मिनी पावसाची नोंद झाली आहे याची टक्केवारी ६१.८ इतकी आहे. याच जिल्ह्यातील आठ तालुक्यांत सरासरीच्या ६० टक्केपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. 

टॅग्स :RainपाऊसAmravatiअमरावती