अपघाती मृत्युप्रकरणी आॅटोरिक्षा चालकाला एक वर्ष कारावास

By Admin | Updated: February 16, 2015 00:12 IST2015-02-16T00:12:56+5:302015-02-16T00:12:56+5:30

अपघातात एका सात महिन्यांच्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या आॅटोचालकाला दोषी ठरवून येथील प्रथम श्रेणी न्यायाधिशांनी विविध कलमांखाली शिक्षा आणि दंड ठोठावला.

Autorickshaw driver imprisonment for one year imprisonment for accidental death | अपघाती मृत्युप्रकरणी आॅटोरिक्षा चालकाला एक वर्ष कारावास

अपघाती मृत्युप्रकरणी आॅटोरिक्षा चालकाला एक वर्ष कारावास

मोर्शी : अपघातात एका सात महिन्यांच्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या आॅटोचालकाला दोषी ठरवून येथील प्रथम श्रेणी न्यायाधिशांनी विविध कलमांखाली शिक्षा आणि दंड ठोठावला. यात तीन हजार रुपये दंड नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशीत केले.
शिक्षापात्र आॅटोरिक्षाचालकाचे नाव सागर अशोकराव डबरासे (रा.लोणी,ता.वरुड) असे आहे. अमोल किसनराव बेलसरे (रा. हिवरखेड) यांच्या पत्नी जया बेलसरे या १५ मार्च २०१३ रोजी अन्य महिलांसोबत मोर्शी येथून हिवरखेडला आॅटोरिक्षाने परतल्या. आॅटोरिक्षातून उतरताच लोणी येथून हिवरखेडकडे येणाऱ्या आॅटोरिक्षाने जया बेलसरे यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा सात महिन्यांच्या मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात जया बेलसरेसुध्दा जखमी झाल्या होत्या. घटनेनंतर अमोल बेलसरे यांनी मोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३३७, ३०४ अ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी सागर डबरासे याला अटक केली होती.
या प्रकरणाचा तपास जमादार राजेंद्र टेकाडे यांनी केला. प्रकरण येथील प्रथम श्रेणी न्यायाधीशांच्या न्यायालयात सादर केले. शासनातर्फे सरकारी वकील शैलेश साहू यांनी फिर्यादीसह एकूण सहा साक्षीदार तपासले. साक्षी-पुराव्यानंतर प्रथम श्रेणी न्यायाधीश अमोल सुर्वे यांनी आरोपी सागर डबरासेविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने सागरला कलम २७९ अंतर्गत ३ महिने साधा कारावास व १ हजार रूपये दंड, कलम ३३७ अंतर्गत ३ महिने साधा कारावास व ५०० रूपये दंड आणि ३०४ अ अंतर्गत १ वर्षे साधा कारावास आणि ३ हजार रूपयेदंडाची शिक्षा ठोठावली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Autorickshaw driver imprisonment for one year imprisonment for accidental death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.