आज प्राप्त होणार गळफास घेतलेल्या मुलाचा शवविच्छेदन अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:13 IST2021-05-27T04:13:32+5:302021-05-27T04:13:32+5:30
अमरावती : फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील महादेवखोरी येथील जंगलात झाडाच्या फांदीला दोन अल्पवयीन मुला व मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ...

आज प्राप्त होणार गळफास घेतलेल्या मुलाचा शवविच्छेदन अहवाल
अमरावती : फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील महादेवखोरी येथील जंगलात झाडाच्या फांदीला दोन अल्पवयीन मुला व मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी मुलीचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला, तर मुलाचा अहवाल गुरुवारी पोलिसांना प्राप्त होणार आहे. त्यातून आत्महत्येचे गूढ उलगडणार आहे.
१६ वर्षीय मुलीची आत्महत्या ही गळफास घेऊनच झाली असल्याचे डॉ. विशाल गावंडे यांनी पोलिसांना दिलेल्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. आज प्राप्त होणाऱ्या अहवालातून मुलाची आत्महत्या स्पष्ट होईल. मात्र दोघांनाही आत्महत्या का केली? हे अद्याप पोलीस बोलायला तयार नाहीत. त्यांचे केव्हापासून प्रेम होते. त्यांना घरच्यांचा विरोध होता का? ते घरून पळून का गेले का? त्यांना कुणी मदत केली? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली? आहे.