बडनेरा जंक्शनवर स्वयंचलित तिकीट वेंडिंग मशीन
By Admin | Updated: May 24, 2016 00:39 IST2016-05-24T00:39:06+5:302016-05-24T00:39:06+5:30
बडनेरा स्थानकात रेल्वे प्रशासनाने चार अॅटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन प्रवाशांच्या सोयीकरिता सुरू केल्या आहेत.

बडनेरा जंक्शनवर स्वयंचलित तिकीट वेंडिंग मशीन
श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरा
बडनेरा स्थानकात रेल्वे प्रशासनाने चार अॅटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन प्रवाशांच्या सोयीकरिता सुरू केल्या आहेत. यामुळे प्रवाशांना रांगेत उभे राहून तिकीट वेंडिंग मशीन प्रवाशांच्या सोयीकरिता सुरू केल्या आहेत. यामुळे प्रवाशांना रांगेत उभे राहून तिकीट काढण्याची कटकट आता दूर झाली आहे. प्रवाशांना तत्काळ तिकीट मिळावी, हा यामागील हेतू आहे.
बडनेरा रेल्वे स्थानकाहून मोठ्या संख्येत प्रवाशी रेल्वे गाड्यांमध्ये चढतात. दरदिवसाला हजारो प्रवासी रेल्वेत बसतात व उतरताना येथून कुठेही प्रवास करण्याची सोय रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करवून दिली आहे. अलिकडे वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वे प्रवासी गाड्यांची संख्यादेखील अधिक झाली आहे. पर्यायाने प्रवासी संख्येमुळे बडनेऱ्यात रेल्वे तिकीट घरांवर प्रवाशांच्या तिकीट मिळविण्यासाठी लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यांचा नाहक मन:स्ताप प्रवाशांना सहन कराव लागत होता. अनेकदा गर्दीमुळे प्रवाशांच्या रेल्वे गाड्या देखील सूटत होत्या. आता बडनेऱ्यात प्रवाशांना त्या कटकटीतून सुटका मिळाली आहे. बडनेरा रेल्वेस्थानकावर एकूण चार आॅटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन्स बसविण्यात आल्या आहेत. दोन मशीन्स नव्या वस्तीच्या तर दोन जुन्यावस्तीच्या बाजूने बसविण्यात आल्या आहेत. या मशीन्समध्ये पैसे टाकून तिकीट मिळविता येते. तसेच रेल्वे तिकीट बुकिंग कार्यालयातून प्रवाशाला स्मार्ट कार्ड देखील रिचार्ज करुन तयार करवून घेता येते. एकूणच या मशीन्समुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. बडनेरा प्रमाणेच अमरावती रेल्वे स्थानकावर देखील अशा प्रकारच्या मशीन्स बसविण्यात आल्या आहेत. प्रवाशांना तत्काळ तिकिट्स मिळण्यात हा हेतू यामागचा रेल्वे मंत्रालयाचा आहे. प्रवाशांनी तिकीट काढता यावी, यासाठी रेल्वेने प्रत्येक मशीनसाठी सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांची कमीशन तत्त्वावर निवड केली आहे.
अॅटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन्स, अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. या मशीन्समुळे प्रवाशांना झटपट तिकीट काढणे शक्य होत आहे. प्रवासी त्याचा वापर करीत आहेत.
- व्ही. डी. कुंभारे, वाणिज्य निरीक्षक
अमरावती रेल्वेस्थानक