पोलीस आयुक्तांकडून ऑटोडिलची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:38 IST2020-12-11T04:38:24+5:302020-12-11T04:38:24+5:30
अमरावती : पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी गुरुवारी रस्त्यावर उतरून वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. या दरम्यान मालवीय चौक ...

पोलीस आयुक्तांकडून ऑटोडिलची झाडाझडती
अमरावती : पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी गुरुवारी रस्त्यावर उतरून वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. या दरम्यान मालवीय चौक येथे वाहन थांबवून खरेदी - विक्री होणाऱ्या ऑटोडिलच्या वाहनांचे रेकॉर्ड त्यांनी तपासले. चोरीचे वाहन तर विकत घेतले नाही ना? या संदर्भात खातरजमा केली.
मालवीय चौकात ऑटोडिलच्या वाहनांचा मोठा व्यवसाय आहे. पोलीस आयुक्तांनी वाहन थांबवून सिटी कोतवाली ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बचाटे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांना ऑटोडिलचे रेकॉर्ड तपासणीचे निर्देश त्यानी दिले. मात्र, ऑटोडिलच व्यवसाय नियमानुसार सुरू असल्याचे पडताळणीत लक्षात आले.
तत्पूर्वी पोलीस आयुक्तांनी जयस्तंभ चौक, चित्रा चौक, प्रभात चौक, या भेटी देऊन शहरातील विस्कळीत वाहतुक व्यवस्थेचा आढावा घेतला. शहरातील नियमबाह्य वाहतुकीला आळा घालण्याकरिता सक्त कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यांनी वाहतुक शाखेच्या कार्यालयाला अकास्मिक भेट देऊन पाहणी केली. रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, विना क्रमांकाची वाहने, फॅन्सी वाहने, संशयित आढळून येणारी वाहने ताब्यात घेऊन कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले. सीपींनी शहरात अकास्मिक दौरा केल्याने शहर पोलीस अलर्ट झाली होती.