नगरोत्थानच्या ‘त्या’ रस्त्यांचे आॅडिट
By Admin | Updated: December 17, 2015 00:29 IST2015-12-17T00:29:23+5:302015-12-17T00:29:23+5:30
महापालिकेच्या नियंत्रणात नगरोत्थान अभियानांतर्गत शहरात सुरु असलेल्या सहा रस्त्यांच्या निर्मितीवर आ. सुनील देशमुख यांनी घेतलेल्या आक्षेपानुसार आॅडिट करण्यात येत आहे.

नगरोत्थानच्या ‘त्या’ रस्त्यांचे आॅडिट
अहवाल अप्राप्त : देशमुखांच्या तक्रारीवर महापालिकेची कारवाई
अमरावती : महापालिकेच्या नियंत्रणात नगरोत्थान अभियानांतर्गत शहरात सुरु असलेल्या सहा रस्त्यांच्या निर्मितीवर आ. सुनील देशमुख यांनी घेतलेल्या आक्षेपानुसार आॅडिट करण्यात येत आहे. स्थानिक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची चमू या रस्ता बांधकामाचे आॅडिट करीत असून अहवाल प्राप्त होताच संबंधित कंत्राटदारावर कारवाई होईल, असे संकेत आहेत.
शासन अनुदान नगरोत्थानांतर्गत काही महिन्यांपूर्वी महापालिकेने पाच प्रमुख रस्त्यांच्या निर्मितीचे काम हाती घेतले होते. मात्र, या रस्ते बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून प्रचंड गैरव्यवहार केला जात असल्याची तक्रार आ. सुनील देशमुख यांनी महापालिकडे केली होती. त्याअनुषंगाने आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनीे या सहाही रस्त्यांच्या बांधकामाची पाहणी करुन यात वापरल्या जाणाऱ्या साहित्याची तपासणी केली होती. यामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचे आयुक्त गुडेवारांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रयोगशाळेतून रस्ते बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची गुणवत्ता व दर्जा तपासणी देखील करण्यात आली.