अतुल पडोळे नवोपक्रम स्पर्धेत प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:14 IST2021-01-03T04:14:33+5:302021-01-03T04:14:33+5:30
मोर्शी/ शेंदूरजनाघाट : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत शेंदूरजनाघाट ...

अतुल पडोळे नवोपक्रम स्पर्धेत प्रथम
मोर्शी/ शेंदूरजनाघाट : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत शेंदूरजनाघाट येथील जनता गर्ल्स हायस्कूलचे सहायक शिक्षक अतुल पडोळे यांनी माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मिळविला. पडोळे यांनी कोविड १९ कालावधीत शाळेत राबविलेला ‘कोविड १९ कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून थांबवलेले शिक्षण सुरू करणे’ या उपक्रमाची निवड जिल्हास्तरावर होऊन राज्यस्तरीय स्पर्धेसा पात्र ठरला. मुख्याध्यापक माया हिवसे, पर्यवेक्षक नीलिमा अंबाडकर तसेच जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जगदीश काळे, उपाध्यक्ष अरुण काळे, सतीश सोलव, सचिव मोहन गणोरकर, चंद्रशेखर टाकरखेडे, संचालक राजेंद्र बेलसरे, संजय बेले, दिवाकर व्होरोकर, अरुण फुटाणे, प्रभाकर सावरकर यांनी समाधान व्यक्त केले.