फासेपारधी समाजाच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष
By Admin | Updated: September 30, 2015 00:36 IST2015-09-30T00:36:59+5:302015-09-30T00:36:59+5:30
शासन व प्रशासन स्तरावर प्रलंबित असलेल्या फासेपारधी समाजाच्या विविध मागण्या तातडीने सोविण्यात याव्यात ...

फासेपारधी समाजाच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष
अमरावती : शासन व प्रशासन स्तरावर प्रलंबित असलेल्या फासेपारधी समाजाच्या विविध मागण्या तातडीने सोविण्यात याव्यात यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी आदिवासी फासे पारधी सुधार समितीच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसह विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक दिली. यावेळी विभागीय आयुक्त ज्ञानेश्र्वर राजूरकर यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. फासे पारधी समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये फासेपारधी समाजाला ई-क्लास जमिनीचे पट्टे देण्याबाबत, पारधी पॅकेज अंतर्गत घरकूल निधी २०१२-१३ यादी मंजूर झाली असून या मंजूर यादीत नावे असणाऱ्या पात्र लाभार्थींना घरकुलाकरिता मंजूर करण्यात आलेला निधी तत्काळ पक्के घरकूल बांधण्याकरिता उपलब्ध करुन देण्यात यावा.
घर दुरुस्तीकरिता आवश्यक निधी संबंधित पात्र लाभार्थींना उपलब्ध करुन द्यावा. दहा ते बारा फासेपारधी लोकांचा समुह तयार केलेल्या फासेपारधी समाजाच्या बेरोजगार तरुणांना, तरुणींना स्वत:चा स्वयंरोजगार सुरू करण्याकरिता प्रत्येकी ५०,००० ही रक्कम उपलब्ध करुन देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष मतीन भोसले उपस्थित होते.