गोवंशहत्या बंदी कायद्याच्या अंमलबजावणीकडे वेधले लक्ष

By Admin | Updated: July 26, 2016 00:23 IST2016-07-26T00:23:51+5:302016-07-26T00:23:51+5:30

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे स्वीकारताच अनेक धाडसी निर्णय घेतले.

Attention to the implementation of cow protection ban | गोवंशहत्या बंदी कायद्याच्या अंमलबजावणीकडे वेधले लक्ष

गोवंशहत्या बंदी कायद्याच्या अंमलबजावणीकडे वेधले लक्ष

विश्वहिंदू परिषद : जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन
अमरावती : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे स्वीकारताच अनेक धाडसी निर्णय घेतले. यापैकीच एक असलेल्या गोवंश हत्या बंदी कायदा राज्यात लागू केला आहे. मात्र या कायद्याची जिल्ह्यात प्रशासनाचे दुर्लक्षामुळे याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी जिल्हाकचेरी समोर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने लक्षवेधी धरणे आंदोलन केले.
प्रमुख मागण्यांमध्ये गोवंशहत्या बंदी कायद्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे चांदूरबाजार तालुक्यात दुर्दैवी घटना घडली. त्याला जबाबदार प्रशासक ीय सेवेतील वरिष्ठ पोलीस अधिकारी व गो-तस्करांना सहाकार्य करणारे सर्व कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांची सीबीआय चौकशी करावी, चांदूर बाजार मार्गावरील खरवाडीजवळ गो-तस्करांव्दारा गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाने जाणीव पूर्वक केलेल्या अपघातात किशोर इंगळे यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. या कृत्याला जाबाबदार असणारे वाहनचालक क्लिनर व सहायकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, ५०० हून अधिक आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, गोवंशहत्या बंदी कायद्याची पायमल्ली होत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणारी ९ सदस्यीय समिती प्रत्येक जिल्हा व तालुकास्तरावर करण्यात यावी, यामध्ये दोन प्रशासकीय अधिकारी, विहिंप, बजरंग दलाचा प्रत्येकी एक पदाधिकारी, वकील, एक पशुचिकित्सक तसेच ज्येष्ठ समाजसेवक असावा व नियमित बैठकी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हावी, किशोर इंगळे कुटुंबातील अनाथ झालेल्या सुजल इंगळे याला १५ लाख रूपयांची मदत देण्यात यावी, तसेच त्याच्या पुढील आयुष्याची हमी राज्य शासनाने घ्यावी, अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनांचा परवाना रद्द करण्यात यावा.आदी मागण्याकडे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने शासन व प्रशानाचे लक्ष वेधले.
याबाबत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. यावेळीे विहिंपचे जिल्हाध्यक्ष सुरेश चिकटे, महानगरध्यक्ष अरूण मोंढे, जिल्हामहामंत्री शरद अग्रवाल, संतोष गहरवाल, प्रवीण गिरी, निरंजन दुबे, अनिल साहू, राजेश घोडके व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्याचा सहभाग होता. (प्रतिनिधी)

शासनाने गोवंशहत्या बंदी कायदा राज्यात लागू केला आहे. मात्र याची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही. त्यामुळे कायद्याचा धाक उरला नसून अवैधरित्या होणाऱ्या गोवंशहत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याला वेळीच नियंत्रण घालण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे झाले आहे.
- अरूण मोंढे,
महानगरप्रमुख, विश्व हिंदू परिषद

Web Title: Attention to the implementation of cow protection ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.