लग्नप्रसंगी २० ची उपस्थिती कागदावरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:12 IST2021-03-19T04:12:28+5:302021-03-19T04:12:28+5:30
राजुरा बाजार : कोरोनाचा संसर्ग शमविण्यासाठी लग्नप्रसंगातील उपस्थितीवर २० ची मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र, तरीही ती डावलून ग्रामीण ...

लग्नप्रसंगी २० ची उपस्थिती कागदावरच!
राजुरा बाजार : कोरोनाचा संसर्ग शमविण्यासाठी लग्नप्रसंगातील उपस्थितीवर २० ची मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र, तरीही ती डावलून ग्रामीण भागात लग्न समारंभात १५० ते २०० नागरिक सहभागी होत आहेत. प्रशासनाकडून ढिलाई होत असल्याने नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे.
वधुवरांकडील केवळ २० ही अट कागदोपत्रीच असल्याचे चित्र तालुक्याच्या ग्रामीण भागात आहे. प्रशासनाकडूनही हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. वरूड तालुक्यात दोन दिवसांपूर्वी एकाच दिवशी ३२ जण संक्रमित झाले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. मात्र, या निबंर्धाचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळेच कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. विवाहापूर्वीची खरेदीदेखील कोरोनाचा प्रसार होण्यासाठी पूरक ठरत आहे.