शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

श्रीसंत खप्ती महाराज संस्थानची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 18:32 IST

Amravati : चांदूर रेल्वे तालुक्यातील बागापूर येथील 'श्रीसंत खप्ती महाराज संस्थान'ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चांदूर रेल्वे तालुक्यातील बागापूर येथील 'श्रीसंत खप्ती महाराज संस्थान'ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फिर्यादी रूपराव निरंजन चौधरी (७३, रा. बागापूर) यांच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी सोमवारी एकूण ८ आरोपींविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

श्री संत खप्ती महाराज हे अविवाहित होते. त्यांनी १९५२ साली निरंजन चौधरी यांना रीतसर दत्तक घेतले होते आणि १० जानेवारी १९५३ रोजी त्यांची दत्तकपुत्र म्हणून नोंदणीही करण्यात आली होती. १० नोव्हेंबर २०२३ रोजी निरंजन चौधरी यांचे निधन झाले. त्यांच्या हयातीत त्यांनी १७ जानेवारी २०२३ रोजी एक मृत्युपत्र तयार केले होते, ज्यावर साक्षीदार म्हणून निरंजन चौधरी यांनी संमती दिली होती.

या मृत्युपत्रानुसार, त्यांच्या मालकीची काही मालमत्ता पुतण्या रूपराव चौधरी यांना देण्यात आली होती, तर उर्वरित सर्व मालमत्ता श्री संत खप्ती महाराज संस्थान, बागापूर या नावाने समाविष्ट करण्यात आली होती. सर्व आठही आरोपींनी मिळकतीबाबत वाद निर्माण केला.

बनावट कागदपत्रांचा असा झाला वापर

फिर्यादीनुसार, आरोपींनी संगनमत करून मालमत्ता हडपण्याचा कट रचला. निरंजन चौधरी यांच्या मालकीच्या सांगळवाडा येथील शेतजमिनीचे मूल्यांकन दाखले व इतर महत्त्वाची कागदपत्रे मिळवून, त्यात फेरफार करून ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवले.आरोपींनी स्वतःची खोटी ओळख निर्माण करून आणि वंशज असल्याचे सांगून संस्थानच्या मालमत्तेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार फसवणुकीच्या उद्देशाने केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

यांच्याविरुद्ध एफआयआर

याप्रकरणी रूपराव निरंजन चौधरी (वय ७३ वर्ष, रा. बागापूर) यांच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी शरद भाऊराव चौधरी, गोवर्धन वामनराव चौधरी, अशोक वामनराव चौधरी, सुरेश वामनराव चौधरी (सर्व रा. बागापूर, ता. चांदूर रेल्वे), धर्मेंद्र गोवर्धन चौधरी, सोनाली धर्मेंद्र चौधरी, पद्माकर गोवर्धन चौधरी (सर्व रा. गिरजानगर, धामणगाव रेल्वे) व अर्चना प्रशांत गंधोळे (रा. यवतमाळ) यांच्याविरुद्ध फसवणूक व गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रोहित कुबडे हे करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Attempt to Grab Shri Sant Khapti Maharaj Trust Property; FIR Filed

Web Summary : Eight individuals are booked for allegedly attempting to seize property of Shri Sant Khapti Maharaj Trust using forged documents. The accused created false identities and documents to claim the property. Police investigation is underway following a complaint.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीfraudधोकेबाजी