पत्नीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:14 IST2021-05-27T04:14:09+5:302021-05-27T04:14:09+5:30
अमरावती : माठावरील ग्लासमध्ये दारू पिणाऱ्या पतीला हटकले असता, पत्नीचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच स्क्रू ...

पत्नीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न
अमरावती : माठावरील ग्लासमध्ये दारू पिणाऱ्या पतीला हटकले असता, पत्नीचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच स्क्रू ड्रायव्हर (पेसकस) ने तिच्या मानेवर, डोक्यावर, गालावर, बोटावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना बेजिनाथनगर, माळविहार चिखलीरोड जि. बुलडाणा येथे २२ मे रोजी घडली. त्यानंतर तिला उपचाराकरिता वडिलांनी अमरावतीच्या बोंडे हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
याप्रकरणी महिलेचे वडील जानराव मससाराम कोकरे (रा. पुसदा, अमरावती) यांच्या तक्रारीवरून आरोपी पती शहर हरिभाऊ कर्नर (२८, रा. बेजिनाथनगर बुलडाणा) याच्याविरुद्ध वलगाव पोलिसांनी भादंविचे कलम ३०७ अन्वये गुन्हा २६ मे रोजी नोंदविला. मुलीला बुलडाणा येथे मारहाण झाल्यानंतर शेजारी राहणाऱ्या एका इसमाने त्यांना डाॅ. राजपूत यांच्या दवाखान्यात उपचाराकरिता दाखल केले होते. मात्र, महिलेचे प्रकृती गंभीर असल्याने वडिलांनी २३ मे रोजी तिला अमरावतीत आणून बोंडे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सदर गुन्हा बुलडाणा येथे वर्ग करण्यात येणार आहे.