लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST2021-06-03T04:10:20+5:302021-06-03T04:10:20+5:30
अमरावती : फेसबुकवरून ओळख झालेल्या एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला. तसेच आरोपीने लग्नास नकार देऊन त्याच्या आई-वडिलांनीसुद्धा ...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
अमरावती : फेसबुकवरून ओळख झालेल्या एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला. तसेच आरोपीने लग्नास नकार देऊन त्याच्या आई-वडिलांनीसुद्धा तरुणीला शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना फ्रेजरपुरा ठाणे हद्दीत मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी श्रीनगर येथे सैनिक म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणासह चारजणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही घटना १ एप्रिल २०२० ते ५ फेब्रवारी २०२१ दरम्यान घडली.
पोलीस सूत्रानुसार, आकाश गुलाबराव शेजव (वय २७, रा. राधिकानगर) असे आरोपीचे नाव असून, अन्य तीन जणांवर भादंविची कलम ३७६(२),३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.
हे मुख्य आरोपी आकाश हा श्रीनगर जिल्ह्यातील अनंतनाग जिल्ह्यात आर. आर. बटालियनमध्ये सैनिक म्हणून कार्यरत आहे. मात्र, त्याची २२ वर्षीय तरुणीशी फेसबुकवरून ओळख झाली. त्यानंतर मी तुझ्यावर प्रेम करतो. लग्न करण्याचे आमिष दाखवून तो जेव्हा-जेव्हा रजेवर यायचा तेव्हा तिच्यावर त्याने विद्यापीठ परिसर, राधिकानगर, मंगलधाम येथे लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मात्र तरुणीने त्याच्या घरी जाऊन लग्नाची मागणी केली असता लग्न करण्यास नकार दिला. तसेच त्याच्या आई-वडिलांनी व जावयाने तिला शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास एपीआय सोनाली मेश्राम करीत आहे. आरोपीला अटक केली असून, दोन दिवसांचा पीसीआर मिळाला आहे.