खारतळेगाव येथे युवतीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:19 IST2020-12-05T04:19:32+5:302020-12-05T04:19:32+5:30
अमरावती : वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारतळेगाव येथे एका २० वर्षीय युवतीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना १ डिसेंबर रोजी ...

खारतळेगाव येथे युवतीवर अत्याचार
अमरावती : वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारतळेगाव येथे एका २० वर्षीय युवतीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना १ डिसेंबर रोजी उघड झाली. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी गुरुवारी गुन्हा नोंदविला.
राहुल विलासराव इंगळे (३०, रा. खीरगव्हाण ता. दर्यापूर), असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादीच्या घरी कुणी नसल्याची संधी पाहून आरोपीने युवतीला शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार दिला असता, जबरदस्तीने पकडून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिने आरडाओरड केला असता, तिचे तोंड दाबले. त्याने तिला जीवाने मारण्याची धमकीसुद्धा दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (२) (एन) ३५४ (ड), ५०६ (ब) अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेतृत्त्वात पोलीस करीत आहेत.