चांदूर रेल्वे शहरात बारवरच्या खोलीत युवतीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2023 11:59 IST2021-09-24T04:14:45+5:302023-11-29T11:59:22+5:30
फोटो - चांदूर रेल्वे २३ पी चांदूर रेल्वे : शहरातील कुऱ्हा रोडवरील शिक्षक बँकेजवळ असलेल्या एका बारच्या इमारतीवरील खोलीत ...

चांदूर रेल्वे शहरात बारवरच्या खोलीत युवतीवर अत्याचार
फोटो - चांदूर रेल्वे २३ पी
चांदूर रेल्वे : शहरातील कुऱ्हा रोडवरील शिक्षक बँकेजवळ असलेल्या एका बारच्या इमारतीवरील खोलीत २४ वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना १५ जुलै २०१९ ते २१ सप्टेंबर २०२१ दरम्यान घडली. याप्रकरणी आरोपीला बुधवारी चांदूर रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्याला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
पोलीस सूत्रांनुसार, हर्षल सुधाकर भेंडे (३२ वर्ष, रा. विरूळ रोंघे) याने लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तरुणीला त्याने मारण्याची धमकी दिली. याबाबत कोणाला काहीही सांगितले, तर बदनामी करण्याची धमकीसुद्धा दिली. या धमक्यांमुळे ती गप्प होती. मात्र, अत्याचार थांबत नसल्याने तिने चांदूर रेल्वे पोलीस ठाणे गाठले व तक्रार नोंदविली. चांदूर रेल्वे पोलिसांनी हर्षलविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (२) (एन), ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. बुधवारी न्यायालयाने आरोपीला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चांदूर रेल्वेचे ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.
photo