सहा वर्षाच्या चिमुकलीवर मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:13 IST2021-04-01T04:13:41+5:302021-04-01T04:13:41+5:30

धामणगाव रेल्वे-मंगरूळ दस्तगीर : मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धूलिवंदनाच्या दिवशी सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी ...

Atrocities on six-year-old Chimukali girl | सहा वर्षाच्या चिमुकलीवर मुलीवर अत्याचार

सहा वर्षाच्या चिमुकलीवर मुलीवर अत्याचार

धामणगाव रेल्वे-मंगरूळ दस्तगीर : मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धूलिवंदनाच्या दिवशी सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी ५५ वर्षीय व्यक्तीला त्याच्या घरून अटक केली. आरोपीने पीडिताच्या वडिलांना धमकावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांनुसार, पीडित चिमुकली अंगणात खेळत असताना आरोपीने होळीची गाठी देण्याच्या बहाण्याने तिला घराजवळ असलेल्या वाड्यात बोलावून नेले व तेथे तिच्यावर अत्याचार केला. पीडिताने ही बाब आईला सांगितली. रंगपंचमी असल्याने एक दिवस थांबून ३० मार्च रोजी पतीला अत्याचाराबाबत कळविले. याबाबत विचारणा केली असता, आरोपीनेच आई-वडिलांना दमदाटी केली. यानंतर दुपारी मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाणे गाठून आईने फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी भादंविचे कलम ३५४ ब, ५०४, ५०६ सह कलम ८, १२ पोक्सो अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. मंगरूळ पोलिसांनी आरोपीला त्याच्या घरून आरोपीस ताब्यात घेतले.

Web Title: Atrocities on six-year-old Chimukali girl