देवदत्त आश्रमात मतिमंद युवतीवर अत्याचार
By Admin | Updated: March 24, 2016 00:25 IST2016-03-24T00:25:35+5:302016-03-24T00:25:35+5:30
स्थानिक देवदत्त आश्रमातील दिगंबरबाबा मुनी महाराजांच्या भावाने मतिमंद युवतीवर अतिप्रसंग केल्याची संतापजनक घटना नजीकच्या वडनेर भूगाव येथे मंगळवारी उघडकीस आली.

देवदत्त आश्रमात मतिमंद युवतीवर अत्याचार
पथ्रोट : स्थानिक देवदत्त आश्रमातील दिगंबरबाबा मुनी महाराजांच्या भावाने मतिमंद युवतीवर अतिप्रसंग केल्याची संतापजनक घटना नजीकच्या वडनेर भूगाव येथे मंगळवारी उघडकीस आली.
पोलीस सूत्रांनुसार, भूगाव येथील एका मतिमंद युवतीला वडनेर भूगाव येथील देवदत्त आश्रमात ठेवण्यात आले होते. याच आश्रमात दिगंबरबाबा मुनी महाराज व त्यांचा भाऊ अशोक पटेल ( रा.समशेदपूर, जि.नंदूरबार) हा सुध्दा त्याच्या आईसोबत राहात होता. अशोक पटेल याने वारंवार अतिप्रसंग केला. यातूनच मुुलीला गर्भधारणा झाल्याने घटनेचे बिंग फुटले. घटनेची मुलीच्या वडिलांनी पथ्रोट पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ठाणेदार सतीश जाधव यांनी आरोपी अशोक पटेल याला अटक केली. घटनास्थळाला उपविभागीय अधिकारी शिवतरे यांनीही भेट दिली. (वार्ताहर)