आतेमामा नव्हे, आतेभावाने केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:15 IST2021-08-15T04:15:40+5:302021-08-15T04:15:40+5:30

पथ्रोट : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताच्या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. यातील आरोपी आतेमामा नव्हे, तर ...

The atrocities committed by Atebhav, not Atemama | आतेमामा नव्हे, आतेभावाने केला अत्याचार

आतेमामा नव्हे, आतेभावाने केला अत्याचार

पथ्रोट : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताच्या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. यातील आरोपी आतेमामा नव्हे, तर त्या मुलीचा सख्खा आतेभाऊ असल्याचे पीडिताच्या आईने पोलिसांना बयानात दिले. त्यावरून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनुसार, पथ्रोट येथे गर्भपातासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील आदिवासी कुटुंबातील एका मुलीची बलात्कारातून अवेळी प्रसूती झाली होती. तिने मृत अर्भकाला जन्म दिला होता. ९ ऑगस्टचे हे प्रकरण बुधवारी तिला अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करावे लागल्याने उघड झाले. सुरुवातीला या मुलीसह कुटुंबाला आणणारा तिचा आतेमामा हा बलात्कारी असल्याचे पीडित मुलीच्या बयानावरून पुढे आले. त्यामुळे तिची आजी, आई व आतेमामा यांना पथ्रोट पोलिसांनी अटक केली होती. आता या घटनेला तिच्या आईच्या बयानाने पुन्हा कलाटणी मिळाली आहे.

पीडिताच्या सख्ख्या आतेभावाने मुलीला पळवून नेले होते. यामुळे बदनामीच्या भीतीने तिच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. सुरुवातीला तोच तिच्या संपर्कात आला होता, असे पोलिसांना तिच्या आईने सांगितले. यामुळे हेमराज (२२) याला पथ्रोट पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली. त्याला शनिवारी दुपारी १ च्या सुमारास गजाआड करण्यात आले. यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता चार झाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सचिन जाधव करीत आहेत.

Web Title: The atrocities committed by Atebhav, not Atemama