एटीएमधारकाची फसवणूक
By Admin | Updated: February 23, 2015 00:49 IST2015-02-23T00:49:16+5:302015-02-23T00:49:16+5:30
शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या एटीएमधारकांची अज्ञाताने २५ हजार १७० रुपयांनी फसवणूक केल्याची घटना राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत शुक्रवारी दुपारी घडली.

एटीएमधारकाची फसवणूक
अमरावती : शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या एटीएमधारकांची अज्ञाताने २५ हजार १७० रुपयांनी फसवणूक केल्याची घटना राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत शुक्रवारी दुपारी घडली. रविनगर हनुमान मंदिर परिसरातील रहिवासी माणकलाल सोमाणी यांना ॅएका अज्ञात मोबाईल क्रंमाकावर कॉल आला होता. तुमच्या देना बँकेचे एटीएम बंद झाल्याचे फोनवरुन सांगण्यात आले. त्यामुळे तुम्हाला नवीन पीन क्रमांक देण्यात येत आहे. त्याकरिता तुमचा जुना पीन क्रमांक सांगा, असे फोनवरुन माणकलाल यांना सांगण्यात आले. बँकेचे अधिकारी समजून माणकलाल यांनी आपल्या एटीएमचा पिन क्रमांक फोनवरील व्यक्तीला सागीतला. या आधारे अज्ञाताने त्यांच्या बँक खात्यातील २१ हजार ५५० तसेच दुसऱ्या बँक खात्यातील ३ हजार ६२० रुपये असे २५ हजार १७० रुपये काढून घेतले. याची माहिती होताच माणकलाल यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.