शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

परतवाड्यातील एटीएम बंद होळीच्या तोंडावर ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 05:00 IST

बस स्टँडसमोरील बँक ऑफ बडोद्याचे एटीएम चार दिवसांपासून बंद पडले आहे. तसा तेथे बोर्डच लागला आहे. बँकेत आत चौकशी केली असता, आम्ही कॅश टाकली आहे. सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल, असे सांगितले गेले. बँक ऑफ बडोदाचे एटीएम नेहमीच समस्याग्रस्त राहते. कधी कॅश नसते, तर कधी बंद असते.

ठळक मुद्देग्राहक त्रस्त। अमरावतीकडे धाव; बाजारहाट करायचा कसा?

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरातील अपवाद वगळता सर्वच एटीएम बंद पडले आहेत. होळीच्या तोंडावर मागील तीन दिवसांपासून एटीएम बंद असल्यामुळे ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. शहरभर फिरूनही एटीएममधून कॅश मिळत नसल्यामुळे लोक त्रस्त आहेत.बस स्टँडसमोरील बँक ऑफ बडोद्याचे एटीएम चार दिवसांपासून बंद पडले आहे. तसा तेथे बोर्डच लागला आहे. बँकेत आत चौकशी केली असता, आम्ही कॅश टाकली आहे. सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल, असे सांगितले गेले. बँक ऑफ बडोदाचे एटीएम नेहमीच समस्याग्रस्त राहते. कधी कॅश नसते, तर कधी बंद असते.कॉटन मार्केटलगत भारतीय स्टेट बँकेच्या कृषी शाखेत एटीएम आहे. ते एटीएमही तीन दिवसांपासून आऊट ऑफ सर्व्हिस पडले आहे. त्यातून कॅशच मिळत नाही. साधा पिनही तेथे जनरेट झाला नाही. कश्यप पेट्रोल पंपजवळील एटीएम बंद आहे. जयस्तंभ चौकातील महाराष्ट्र बँकेचे एटीएम, नगर परिषद समोरील युनियन बँकेचे एटीएम, जगदंब चौकातील एक्सीस बँकेचे एटीएम, पोलीस ठाण्याजवळील एचडीएफसी बँकेचे एटीएम बंद पडले आहे. या एकाही एटीएममधून पैसे निघेनासे झाले आहे.शहरात गुरुवारपासून एटीएमची हीच स्थिती आहे. ग्राहकांच्या खात्यातून न चुकता एटीएम सेवा शुल्क परस्पर कापून घेणाऱ्या या बँकांना मागील तीन दिवसांपासून साधी दखलही घ्यावशी वाटलेली नाही. गुरुवार बाजाराचा दिवस, होळीचा बाजार, मेळघाटपासून सर्वांचीच गर्दी परतवाड्यात असते. या बाजारालाही एटीएम बंदचा फटका बसला आहे.

१०० च्या नोेटाही नाहीतपूर्वी एटीएममधून दोन हजारांच्या नोेटा अधिक निघायच्या. आता केवळ ५०० रुपयांची नोट एटीएममधून बाहेर पडते. ज्याला १०० किंवा २०० रुपयांचेच काम असेल, त्याला उगाचच ५०० रुपये काढावे लागतात. जुळ्या शहरातील सर्वच एटीएममध्ये कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे. बँका त्याबाबत चकार शब्दही बोलायला तयार नाहीत.

टॅग्स :atmएटीएम