ॲथलेटिक्स खेळांना शिवछत्रपती पुरस्कार द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:12 IST2021-01-23T04:12:40+5:302021-01-23T04:12:40+5:30
अमरावती : जिम्नॅस्टिक खेळांप्रमाणे ॲथलेटिक्स खेळांतील उपप्रकारांनादेखील शिवछत्रपती पुरस्कार देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन येथील कुस्तीपटूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी ...

ॲथलेटिक्स खेळांना शिवछत्रपती पुरस्कार द्यावा
अमरावती : जिम्नॅस्टिक खेळांप्रमाणे ॲथलेटिक्स खेळांतील उपप्रकारांनादेखील शिवछत्रपती पुरस्कार देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन येथील कुस्तीपटूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांना शुक्रवारी देण्यात आले.शिवछत्रपती पुरस्काराच्या सुधारित निमावलीत जिम्नॅस्टिक खेळातील एरोबिक्स आणि अक्रोबेटिक्स हे दोन प्रकार ऑलम्पिक, आशियाई ,कॉमनवेल्थमध्ये खेळले जात नाही. तरीदेखील त्यांना हा पुरस्कार दिला जातो. त्याच आधारे त्यांना शासकीय नोकरीसुद्धा दिली जाते. परंतु ॲथलेटिक्स कुस्ती, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, जुदो, शरीर सौष्ठव, तलवारबाजी, उशू यामध्ये अनेक उपप्रकार असलेल्या खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार देण्यात नाही. हा अन्याय दूर करून या खेळाडूंना २, ३ पुरस्कार देण्यात यावा. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी समीर देशमुख, ऋतिक सावरकर, वैभव काळे, जितेंद्र भोयर, नदीम खान, शोएब खान, आरिफ खान, भूषण भोसले आदी खेळाडूं उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी सदर निवेदन स्वीकारून या संदर्भाची मागणी राज्यभरातून येत असल्याचे सांगून आपली मागणी वरिष्ठांना पोहचविण्याचे आश्वासन दिले.