मोर्शी तालुक्यातील ७७ गावांमध्ये अटल भूजल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST2021-05-05T04:21:49+5:302021-05-05T04:21:49+5:30
मोर्शी : भूर्गभातील सिंचनाअभावी पाणीपातळी खोल गेल्याने भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, याकरिता केंद्र शासन व ...

मोर्शी तालुक्यातील ७७ गावांमध्ये अटल भूजल
मोर्शी : भूर्गभातील सिंचनाअभावी पाणीपातळी खोल गेल्याने भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, याकरिता केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रासह देशातील अन्य सात राज्यामध्ये अटल भूजल योजना राबवण्यात येत आहे. मोर्शी तालुक्यातील ७७ गावे या योजनेचे लाभार्थी आहेत.
महाराष्ट्रातील एकूण १३ जिल्ह्यांमध्ये ही अटल भूजल योजना राबविली जाणार आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यात मोर्शी तालुक्यातील ७७, वरूड तालुक्यातील ६५, चांदूर बाजार ५४ अशा एकूण २१७ गावाचा समावेश असल्याची माहिती जीएसडीएचे वरिष्ठ भूवैज्ञानिक विश्वास वालदे यांनी सांगितले. याबाबत सहायक भूवैज्ञानिक हिमा जोशी यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी वरूड तालुक्यात दहा गावांची निवड केली आहे. तेथे भूगर्भात पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने पाणीपातळी खोल गेली आहे. शेतातील विहिरी कोरड्या होऊन शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कारली, वरूड, वाठोडा, मालखेड, पांधरघटी, जामगाव, उदापूर, गव्हाणकुंड, खडका, पिंपळखुटा, झटमझिरी या १० गाावांचा त्यात समावेश असल्याची माहिती भूवैज्ञानिक केतकी जाधव यांनी दिली.