अट्टल चोर राम मढावी अटकेत

By Admin | Updated: September 6, 2015 00:14 IST2015-09-06T00:14:40+5:302015-09-06T00:14:40+5:30

अट्टल चोर राम दिनेश मढावी (२४, रा. अंबाझरी, नागपूर) व त्याचा साथीदार अनिल आनंद आतराम (२१ ,रा. मसानगंज) या दोघांना ...

Atal Chor ram madhavi detained | अट्टल चोर राम मढावी अटकेत

अट्टल चोर राम मढावी अटकेत

१९ गुन्ह्यांची कबुली : चोरींची २४ स्थळे दाखविली
अमरावती : अट्टल चोर राम दिनेश मढावी (२४, रा. अंबाझरी, नागपूर) व त्याचा साथीदार अनिल आनंद आतराम (२१ ,रा. मसानगंज) या दोघांना अमरावती पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक केली. आरोपींनी १९ गुन्हांची कबुली दिली असून चोरांनी पोलिसांना चोरीची २४ स्थळे दाखविली.
वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता अमरावती पोलिसांनी तपासकार्य सुरु केले होते. चोरी झालेल्या घटनास्थळांची सीसीटीव्ही फुटेजवरून चार दिवसांपूर्वी पोलिसांनी आरोपींची शहानिशा केली. त्यानुसार पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, पोलीस निरीक्षक प्रमेश आतराम, सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे, पीएसआय दिलीप वाघमारे, पोलीस कर्मचारी गणेश काळे, चैतन्य रोकडे, दिपक श्रीवास, प्रणय वाघमारे, निलेश गुल्हाने, संदीप देशमुख, चालक संतोष रौराळे व दीपक देशमुख यांनी आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी रात्रीच्या वेळी व्यापारी प्रतिष्ठाने फोडून लाखो रुपयांचा माल लंपास केला आहे. यातील अट्टल चोर राम मढावी याला अंबाझरी, राणा प्रताप मगर, कोराडी सीताबर्डी व काटोल पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरूध्द विविध पोलीस ठाण्यांत ३० गुन्हे दाखल आहेत. चौकशीत आरोपींनी अमरावतीमधील २४ व्यापारी प्रतिष्ठाने फोडून चोरी केल्याची कबुल केले आहे. रविवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करुन पोलीस कोठडीची मागणी पोलीस करणार आहेत. या चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Atal Chor ram madhavi detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.