खगोलपे्रमींना शनी ग्रहाचे दर्शन
By Admin | Updated: May 25, 2015 00:02 IST2015-05-25T00:02:55+5:302015-05-25T00:02:55+5:30
एसआरपीएफ कॅम्प परिसरातील रहिवासी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी शनिवारी खगोलप्रेमींना शनीग्रह...

खगोलपे्रमींना शनी ग्रहाचे दर्शन
जिज्ञासा : खगोल अभ्यासकाने उपलब्ध करून दिली संधी
अमरावती : एसआरपीएफ कॅम्प परिसरातील रहिवासी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी शनिवारी खगोलप्रेमींना शनीग्रह दर्शनाचा योग घडवून आणला. यावेळी शहरातील अनेक विद्यार्थी, खगोलपे्रमी व जिज्ञासूंनी दुर्बिणीतून शनीग्रहाचे दर्शन घेतले आहे.
२३ मे रोजी शनीग्रह पृथ्वीच्या जवळ आला होता. याग्रहाची रिंग ३ इंच व्यासाच्या दुर्बिणीतून विनामूल्य पाहण्याची संधी गिरुळकर यांनी उपलब्ध करुन दिली. शनीची रिंग भूगोलाच्या पुस्तकातील चित्रामध्ये अनेकदा विद्यार्थ्यांनी पाहिली आहे. मात्र, पहिल्यांदाच १३४ कोटी लक्ष किलोमिटर अंतरावरील शनी ग्रहाची रिंग अमरावतीमधून प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली आहे.
शहरातील एमपीएससी, यूपीएससीची तयारी करीत असलेले विद्यार्थी व स्पेस सायन्सकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी शनीग्रहाच्या रिंगचा अनुभव जाणून घेतला. यावळी विद्यार्थ्यांना खगोल शास्त्रातील प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये अचूक उत्तर देणाऱ्यांना गिरुळकर यांनी पुस्तके व नोट्स बक्षीस स्वरुपात दिले.
या अभ्यासातून आंतरराष्ट्रीय आॅलिम्पियाड स्पर्धेत भाग घेण्याची तयारीही विद्यार्थ्यांनी दर्शविली. गिरुळकर यांनी विद्यार्थ्यांना शनी ग्रहाविषयीचे ज्ञान अवगत करुन दिले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन विद्यार्थ्यांना शनी ग्रहाविषयीची अंधश्रद्धा दूर केली. यापासून विद्यार्थांनाही प्रेरणा मिळत आहे.
पृथ्वीच्या जवळ आलेल्या शनी ग्रहाची रिंग प्रत्यक्षात कशी दिसते. याचा अनुभव विद्यार्थी व खगोलप्रेमींनी घेतला. त्यामुळे शनी ग्रहाविषयीची अंधश्रद्धा बऱ्याचशा प्रमाणात कमी झाली आहे.
- विजय गिरूळकर,
हौशी खगोल अभ्यासक,